१०० वर्षांपूर्वीचा विदर्भ कसा होता? ब्रिटिशांच्या गॅझेटिअर्समध्ये काय लिहिलयं?

Shubham Banubakode

बेरार

आजचा विदर्भ ब्रिटिश काळात बेरार किंवा वऱ्हाड या नावाने ओळखला जायचा. त्यावेळी हा भाग आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात होता.

Vidarbha history

|

esakal

कापसासाठी प्रसिद्ध

ब्रिटिश काळात विदर्भाची ओळख कापसाचे मोठे उत्पादन करणारा प्रदेश अशी होती. इथल्या काळ्या कसदार जमिनीत कापसाचे पीक चांगले येत होते.

Vidarbha history

|

esakal

आर्थिक भरभराट

अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळ या भागांत कापसाचा मोठा व्यापार चालायचा. त्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये आर्थिक उलाढाल वाढली होती.

Vidarbha history

|

esakal

थेट इंग्लंडमध्ये

रेल्वेच्या माध्यमातून विदर्भातील कापूस मुंबई बंदरापर्यंत नेला जायचा. तिथून तो इंग्लंडमधील मँचेस्टरसारख्या औद्योगिक शहरांमध्ये पोहोचत होता.

Vidarbha history

|

esakal

सिंचनाची नोंद

ब्रिटिश गॅझेटिअर्समध्ये विदर्भातील शेती, सिंचन पद्धती आणि स्थानिक बाजारपेठांची माहिती दिली आहे. त्यातून तत्कालीन ग्रामीण अर्थव्यवस्थेची कल्पना येते.

Vidarbha history

|

esakal

संस्कृतीची माहिती

त्या काळातील लोकसंख्या, जाती-जमाती, सण-उत्सव आणि बोलीभाषांची नोंदही गॅझेटिअर्समध्ये करण्यात आली होती. यातून जुन्या विदर्भाचे सामाजिक चित्र समोर येते.

Vidarbha history

|

esakal

चिखलदराचंही आकर्षण

सातपुड्याच्या पर्वतरांगांमधील चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणाची नोंदही ब्रिटिशांनी केली होती. विदर्भाच्या निसर्गसंपत्तीचाही त्यांनी उल्लेख केला होता.

Vidarbha history

|

esakal

महत्त्वाचे दस्तऐवज

शंभर वर्षांपूर्वीचा विदर्भ कसा होता, हे समजून घेण्यासाठी ब्रिटिशकालीन गॅझेटिअर्स आजही महत्त्वाचे ऐतिहासिक दस्तऐवज मानले जातात.

Vidarbha history

|

esakal

महाराष्ट्राची लाडकी एसटी सुरुवातीला लाल नव्हती! तिचा पहिला रंग कोणता होता?

Maharashtra ST History

|

esakal

हेही वाचा -