महाराष्ट्राची लाडकी एसटी सुरुवातीला लाल नव्हती! तिचा पहिला रंग कोणता होता?

Shubham Banubakode

एसटीचा प्रवास

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटीचा प्रवास १ जून १९४८ रोजी पुणे ते अहमदनगर मार्गावर सुरू झाला होता.

Maharashtra ST History

|

esakal

पहिल्या एसटीचा रंग

आज लाल रंगामुळे ओळखली जाणारी एसटी सुरुवातीला लाल नव्हती. पहिल्या बसचा रंग निळा आणि चंदेरी होता.

Maharashtra ST History

|

esakal

सुरुवातीला ३० बसेस

एसटीची सुरुवात अवघ्या ३० बसेसने झाली होती. तेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचा प्रवास अजून लांब होता.

Maharashtra ST History

|

esakal

बसची रचना

पहिल्या एसटी रचना आजच्या आधुनिक बसेसच्या तुलनेत साधी आणि वेगळी होती.

Maharashtra ST History

|

esakal

सीट्स

पहिल्या एसटीमधील सीट्स नारळाच्या काथ्यापासून बनवल्या होत्या. त्यामुळे आजच्या आरामदायी प्रवासाची कल्पना तेव्हा नव्हती.

Maharashtra ST History

|

esakal

पहिल्या बसचे कंडक्टर

पहिल्या एसटीचे कंडक्टर लक्ष्मण केवटे होते. एसटीच्या इतिहासातील त्यांचे नाव एका आदराने घेतलं घेतलं जातं.

Maharashtra ST History

|

esakal

शिवाईला हिरवा झेंडा

२०२२ मध्ये पुणे-अहमदनगर मार्गावर सुरू झालेल्या पहिल्या इलेक्ट्रिक शिवाई बसला हिरवा झेंडा दाखवण्याचा मान लक्ष्मण केवटे यांना मिळाला होता.

Maharashtra ST History

|

esakal

एसटीचं नेटवर्क

आज एसटी गावागावांना जोडते. शाळा, बाजार, दवाखाना किंवा नातेवाईकांकडे जाण्यासाठी ती अनेकांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे.

Maharashtra ST History

|

esakal

पाल खरच विषारी असते का? चावल्यास काय होईल?

Is a house lizard poisonous

|

esakal

हेही वाचा-