राजा राजा चोलांच्या 'या' मंदिरात दडलाय १,००० वर्षांपूर्वीचा हिशोब; दगडांवर कोरलंय अकाउंट बुक!

सकाळ डिजिटल टीम

चोल साम्राज्याचे अकाउंट बुक

तंजावरचे प्रसिद्ध बृहदीश्वर मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नाही. राजा राजा चोल पहिला याने बांधलेल्या या मंदिराच्या भिंतींवर १,००० वर्षांपूर्वीचा पारदर्शक हिशोब कोरलेला आहे.

Brihadisvara Temple

|

sakal 

ग्रॅनाइट दगड

इ.स. १००३ ते १०१० या काळात हे भव्य मंदिर साकारण्यात आले. राजे आणि साम्राज्ये नष्ट झाली तरी हा इतिहास टिकावा म्हणून ग्रॅनाइटच्या दगडांवर हा महसूल अभिलेख कोरला गेला.

Brihadisvara Temple

|

sakal 

१०७ शिलालेख

मंदिराच्या भिंती आणि पायावर तमिळ लिपीत तब्बल १०७ शिलालेख कोरलेले आहेत. हे केवळ धार्मिक मंत्र नसून तत्कालीन अर्थव्यवस्था आणि सुशासनाची साक्ष देणारे ऐतिहासिक पुरावे आहेत.

Brihadisvara Temple

|

sakal 

खडान् खडा हिशोब

राजा, राण्या, सेनापती आणि जनतेने मंदिराला दिलेल्या सोन्याच्या प्रत्येक ग्रॅमची यात नोंद आहे. सोन्याचे दागिने, त्यांचे अचूक वजन आणि दागिन्यांमधील मौल्यवान खड्यांची संख्याही यात स्पष्ट नमूद आहे.

Brihadisvara Temple

|

sakal 

कर्मचाऱ्यांची नावे

मंदिरात काम करणाऱ्या ४०० हून अधिक नर्तिका, संगीतकार, शिंपी आणि सुतारांची नावे शिलालेखात आहेत. इतकेच नव्हे तर त्यांच्या मूळ गावांची नावे, घर क्रमांकसुद्धा कोरण्यात आले आहेत.

Brihadisvara Temple

|

sakal 

वेतन,धान्य वाटपाची माहिती

कोणत्या कर्मचाऱ्याला दररोज किंवा वर्षाला किती भात आणि पैसे मानधन म्हणून द्यायचे, याचा अगदी स्पष्ट आणि पारदर्शक हिशोब या दगडांवर वाचायला मिळतो.

Brihadisvara Temple

|

sakal 

जमीन महसूल, करप्रणालीची नोंद

चोल साम्राज्यातील कोणत्या गावाने मंदिराला किती कर किंवा धान्याचा वाटा द्यायचा, याची मोजणी अत्यंत अचूकपणे नोंदवून ठेवली आहे.

Brihadisvara Temple

|

sakal 

युरोपच्या आधी सुशासनाचा आदर्श नमुना

युरोपीय देशांत कागदावर हिशोब ठेवण्याआधी चोल राजांनी भारतात पारदर्शक प्रशासनाचा पाया रचला होता. याच ऐतिहासिक महत्त्वामुळे UNESCO ने याला जागतिक वारसा स्थळ घोषित केले आहे.

Brihadisvara Temple

|

sakal 

चालुक्यांची राजधानी असलेल्या बदामी शहराचा इतिहास काय?

Capital of the Chalukya Empire

|

sakal 

आणखी वाचा