सकाळ डिजिटल टीम
कर्नाटक राज्यातील उत्तर भागात वसलेले बदामी हे शहर एकेकाळी दक्षिण भारतातील सर्वात शक्तिशाली चालुक्य राजघराण्याची राजधानी होते, ज्याचे जुने नाव 'वातापी' असे होते.
Capital of the Chalukya Empire
sakal
मलप्रभा नदीच्या खोऱ्यात खडकाळ, लालसर डोंगररांगांमध्ये वसलेले बदामी हे शहर चालुक्य साम्राज्याच्या समृद्ध शेती अर्थव्यवस्थेचे केंद्र होते.
Capital of the Chalukya Empire
sakal
पुराणानुसार, या भागात वातापी नावाचा राक्षस राहत होता, ज्याचा वध महर्षी अगस्त्य यांनी केला, आणि याच कथेवरून या शहराचे नाव वातापी पडले.
Capital of the Chalukya Empire
sakal
इ.स. ५४४ मधील पुराव्यांनुसार, बादामीचा संस्थापक पुलकेशिन पहिला याने या परिसराची रचना अत्यंत सुरक्षित आणि मजबूत तटबंदीयुक्त ठिकाण म्हणून केली होती.
Capital of the Chalukya Empire
sakal
सहाव्या ते आठव्या शतकादरम्यान लालसर आणि पिवळसर रंगाच्या मऊ दगडांमध्ये कोरलेल्या या चार लेण्या भारतीय शिल्पकलेचा उत्कृष्ट आणि अद्वितीय नमुना आहेत.
Capital of the Chalukya Empire
sakal
पहिल्या लेणीत , भगवान शिवांची अठरा हातांची नटराज मुद्रेतील तांडव नृत्याची भव्य आणि सुंदर शिल्परचना कोरलेली आहे.
Capital of the Chalukya Empire
sakal
पायऱ्यांवरून वर गेल्यावर दुसऱ्या लेणीत विष्णूचे त्रिविक्रम अवतार, वराह अवतार आणि समुद्रमंथनाच्या अनेक सुंदर पौराणिक कथा कोरलेल्या पाहायला मिळतात.
Capital of the Chalukya Empire
sakal
तिसऱ्या लेण्यात शेषनागावर विराजमान झालेली भगवान विष्णूंची दुर्मिळ मूर्ती असून, तिथे प्राचीन भित्तिचित्रांचे काही अवशेष आजही स्पष्टपणे टिकून आहेत.
Capital of the Chalukya Empire
sakal
चौथी आणि शेवटची लेणी ही पूर्णपणे जैन धर्माला समर्पित असून, तिथे महावीर स्वामी, पार्श्वनाथ आणि बाहुबली यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
Capital of the Chalukya Empire
sakal
मानवनिर्मित अगत्स्य तलावाच्या काठावर लाल दगडांत बांधलेले सुंदर भूतनाथ मंदिर या संपूर्ण पर्यटन परिसराचे मुख्य आकर्षण आहे.
Capital of the Chalukya Empire
sakal
मुघलांना हुसकावून लावणारी गोंडवानाची राणी कोण होती?
Brave Gondwana Queen
sakal