सूरज यादव
थायलंडच्या संवैधानिक न्यायालयाने २ जुलै २०२५ रोजी पंतप्रधान पेटोंगटार्न शिनवात्रा यांना निलंबित केलं. कंबोडियाच्या नेत्याशी फोनवरचं संभाषण लीक झाल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.Esakal
पेटोंगटार्न यांनी कंबोडियाचे नेते हुन सेन यांना काका म्हटलं तर थायलंडच्या लष्करप्रमुखाला विरोधक म्हटले. याच लीक कॉलमुळे जनतेत संताप निर्माण झालाय.
९व्या शतकातील हिंदू मंदिर प्रेह विहेयर हा थायलंड-कंबोडिया सीमा विवादाचा केंद्रबिंदू आहे. खमेर सम्राट सूर्यवर्मन यांनी भगवान शिवासाठी हे मंदिर बांधले.
१९६२ मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (ICJ) मंदिर कंबोडियाच्या हद्दीत असल्याचा निर्णय दिला. थायलंडला हा निर्णय मान्य नाही, विशेषतः आसपासच्या जमिनीवरून वाद कायम आहे.
२००८ मध्ये कंबोडियाने प्रेह विहेयरला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकन दिले. तेव्हा थायलंडने विरोध केल्यानंतर दोन्ही देशांत तणाव वाढला आणि २०११ मध्ये संघर्ष झाला.
२८ मे २०२५ रोजी थायलंड-कंबोडिया सैन्यांत संघर्ष झाला. यामध्ये एक कंबोडियाई सैनिक ठार झाला. दोन्ही देशांनी एकमेकांवर गोळीबाराचा आरोप केला.
कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट यांनी १ जून रोजी वाद ICJ मध्ये नेण्याची घोषणा केली. थायलंडने ICJ चे अधिकार क्षेत्र नाकारले आणि द्विपक्षीय समितीवर भर दिला.
२०११ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी वाद ASEANकडे सोपवला होता. पण ASEAN कडून काही प्रतिसाद मिळाला नाही. थायलंडमध्ये यामुळे राजकीय अस्थिरता आणि सीमावाद कायम आहे.