कसा होता १९७२ चा महाराष्ट्रातील दुष्काळ? पाहा ७२ च्या दुष्काळाची कहाणी!

सकाळ डिजिटल टीम

सर्वांत भीषण दुष्काळ

१९७१-७२ च्या काळात पडलेला दुष्काळ हा स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत भयंकर आणि वेदनादायी अध्याय मानला जातो.

1972 Maharashtra Drought History

|

sakal 

सलग तीन वर्षे पावसाची पाठ

महाराष्ट्रात सलग तीन वर्षे पाऊस न पडल्यामुळे खरीप अन् रब्बी दोन्ही पिके पूर्णपणे जळून गेली आणि जमिनीला मोठ्या भेगा पडल्या.

1972 Maharashtra Drought History

|

sakal 

थेंबभर पाण्यासाठी तासनतास वाट

गावांतील विहिरी कोरड्या पडल्याने महिलांना पाण्यासाठी ५ ते १० किलोमीटर चालावे लागे, तर पाण्यासाठी होणारी भांडणे नित्यनियमाची झाली होती.

1972 Maharashtra Drought History

|

sakal 

जनावरांची उपासमार अन् दुर्दैवी अंत

चारा आणि पाण्याअभावी शेतकऱ्यांचे वैभव मानली जाणारी गायी-बैल कवडीमोल भावाने विकली गेली, तर हजारो जनावरे भुकेने मरण पावली.

1972 Maharashtra Drought History

|

sakal 

उपासमारीचे दिवस

रेशन दुकानांसमोर लांबच लांब रांगा लागत असत; अनेक कुटुंबांनी झाडांची पाने अन् रानभाज्या खाऊन दिवस काढले.

1972 Maharashtra Drought History

|

sakal 

शहरांकडे स्थलांतर

गावात रोजगार अन् अन्न नसल्याने हजारो कुटुंबांनी गावे सोडली आणि मुंबई, पुणे, सोलापूरसारख्या शहरांकडे मजुरीसाठी स्थलांतर केले.

1972 Maharashtra Drought History

|

sakal 

'रोजगार हमी'

अत्यंत कठीण काळात दगड फोडणे आणि माती उचलणे अशा रोजगार हमी योजनेच्या (EGS) कामांवर मिळणाऱ्या मजुरीवर लाखो कुटुंबे जगली.

1972 Maharashtra Drought History

|

sakal 

खाजगी व सामाजिक पातळीवरील मदत

शासकीय उपायांसोबतच खाजगी व सामाजिक संस्थांनी पुढे येत नागरिकांसाठी मफतलाल समूहाच्या 'सुखडी' वाटपासारख्या योजना चालवल्या.

1972 Maharashtra Drought History

|

sakal 

जलसंधारण

या भीषण संकटातून शिकून महाराष्ट्रात पाझर तलाव, बंधारे, जलसंधारण आणि मजबूत दुष्काळ व्यवस्थापन यंत्रणेची पायाभरणी झाली.

1972 Maharashtra Drought History

|

sakal 

महाराष्ट्राच्या सामूहिक स्मृतीतील जिवंत जखम

१९७२ च्या दुष्काळाने फक्त पिकेच नाही तर हजारो स्वप्ने जाळली; हा काळ आजही महाराष्ट्रातील वयस्कर पिढीच्या डोळ्यात पाणी आणतो.

1972 Maharashtra Drought History

|

sakal 

1980 चा ट्रेंड पाहिला, आता 1925 ची आळंदी पाहा! 5 वा फोटो तर पाहायलाच हवा!

See How Alandi Looked 100 Years Ago!

|

sakal 

आणखी वाचा