200 वर्षांपूर्वीचं कंडोम, प्राण्याच्या 'या' अवयवापासून बनवलेलं

सकाळ वृत्तसेवा

म्युझियम

'अॅमस्टरडम'मधील रिक्सम्युझियम या संग्रहालयात २०० वर्षे जुना कंडोम ठेवण्यात आलेलं आहे.

कंडोम

या कंडोमचा वापर झाला नसल्याचं सांगण्यात आलं. हा कंडोम अतिशय सुस्थितीत आहे.

मेंढीच्या आतड्यापासून

हा कंडोम मेंढीच्या आतड्यापासून तयार केलेला होता. कंडोमवर तीन धर्मगुरुंचं चित्र काढण्यात आलेलं आहे.

दुर्मिळ कंडोम

दुर्मिळ कंडोम १८३० सालचं आहे. एका लिलाव प्रक्रियेतून संग्रहालयाने ते विकत घेतलं.

जॉयस झेलेन

कंडोम बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती, असं रिक्सम्युझियमचे क्युरेटर जॉयस झेलेन यांनी 'बीबीसी'ला सांगितलं.

वेश्यालय

फ्रान्समधल्या एका अलिशान वेश्यालयातला हा कंडोम असू शकतो, असं सांगितलं जात आहे.

तीन धर्मगुरु

कंडोमवर एक नन आणि तीन धर्मगुरुंचे एक अश्लील चित्र छापलेले आहे. त्यावर Voila mon choix म्हणजे 'माझी निवड' असं लिहिलं आहे.

प्रिंटेड कंडोम

प्रिंटेड कंडोम एकमेव असल्याचं झेलेन म्हणाल्या. ही वस्तू अतिशय नाजूक असल्याने त्याला हाताळणं जोखिमीचं काम आहे.

संग्रहालय

नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत हे कंडोम संग्रहालयामध्ये ठेवण्यात येणार आहे. ते लोकांना बघता येईल.

गर्भपात करण्यासाठी मुघल काय करायचे?

mughal harem | esakal
येथे क्लिक करा