Sandeep Shirguppe
कागदी कपातून (Paper Cup) अनेकजण चहा (Tea) पितात. पण याचे अनेक आरोग्यावर घातक परिणाम होतात.
संशोधनानुसार, दिवसात तीन वेळा कागदी कपातून चहा पिल्यास अंदाजे ७५ हजार सूक्ष्मप्लास्टिक कण शरीरात जातात.
गरम चहामुळे कपाला लावलेल्या हायड्रोफोबिक फिल्मचे सूक्ष्मकण आणि विषारी घटक चहात मिसळतात.
कागदी कपात १५ मिनिटांसाठी गरम चहा ठेवून संशोधन करण्यात आले यामध्ये अनेक विषारी घटक आढळले.
पाण्यातील सूक्ष्मप्लास्टिक हे पॅलाडियम, क्रोमियम, कॅडमियम यांसारख्या विषारी घटकांचे वाहक असतात.
सजीवांमध्ये हे विषारी घटक प्रवेश करतात, अशी माहिती संशोधनातून समोर आली आहे.
संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, १०० मिलीलिटर उकळते पाणी (८५-९० अंश से.) एका कागदी कपात १५ मिनिटांसाठी ठेवले.
२५ हजार सूक्ष्मकण आढळून आले, दिवसातून तीन वेळा कागदी कपातून चहा पिल्यास ७५ हजार सूक्ष्मकण शरीरात जात असल्याचे समोर आले.