Pranali Kodre
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने १२ मे रोजी कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटलं.
त्याने सोशल मिडिया पोस्ट करत त्याची निवृत्ती जाहीर केली.
त्याने निवृत्तीच्या पोस्टमध्ये कसोटी क्रिकेट खेळण्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली आहे.
त्याने त्याच्या पोस्टच्या शेवटी #269 हा आकडा टाकून अलविदा म्हटलं आहे.
त्यामुळे २६९ हा आकडा नेमका कशासाठी असा अनेकांना प्रश्न पडला असेल.
खरंतर क्रिकेटमध्ये ज्यावेळी खेळाडू पदार्पण करतो, तेव्हा तो त्या संघाकडून पदार्पण करणारा कितव्या क्रमांकाचा खेळाडू आहे, त्या क्रमांकाची कॅप त्याला दिली जाते.
विराटने जेव्हा २०११ मध्ये भारताकडून वेस्ट इंडिजविरुद्ध किंग्स्टनला कसोटी पदार्पण केले, तेव्हा तो भारतासाठी कसोटी खेळणारा २६९ वा खेळाडू ठरला होता.
त्याला या क्रमांकाची कॅप देण्यात आलेली, तेव्हा पासून त्याच्या कसोटीच्या जर्सीवरही २६९ क्रमांक बीसीसीआयच्या लोगोच्या खाली लिहिलेला दिसतो.
विराटने गेल्या १४ वर्षात १२३ कसोटी सामने खेळताना ३० शतके आणि ३१ अर्धशतकांसह ९२३० धावा केल्या.