Pranali Kodre
मँचेस्टरमध्ये इंग्लंड आणि भारत संघात चौथा कसोटी २३ ते २७ जुलै दरम्यान खेळवण्यात आला.
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने अष्टपैलू कामगिरी करताना पहिल्या डावात त्याने ५ विकेट्स घेतल्या, तसेच त्याने फलंदाजी करताना १४१ धावांची खेळीही केली.
स्टोक्सने या सामन्यात कसोटी कारकिर्दीत ७००० धावाही पूर्ण केल्या. स्टोक्सने २२५ हून अधिक विकेट्सही कसोटी क्रिकेटमध्ये घेतल्या आहेत.
त्यामुळे स्टोक्स कसोटीमध्ये ७००० धावा आणि २०० हून अधिक विकेट्स घेणारा जगातील केवळ तिसराच अष्टपैलू खेळाडू ठरला आहे.
त्याच्यापूर्वी गॅरी सोबर्स आणि जॅक कॅलिस या खेळाडूंनीच कसोटीत ७००० हून अधिक धावा आणि २०० हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
गॅरी सोबर्स यांनी ९३ कसोटी सामन्यांत ८०३२ धावा केल्या आहेत आणि २३५ विकेट्स घेतल्या आहेत.
जॅक कॅलिसने १६६ कसोटी सामने खेळताना १३२८९ धावा केल्या आहेत आणि २९२ विकेट्स घेतल्या आहे.