Pranali Kodre
जसप्रीत बुमराह हा सध्याचा सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याची अनोखी गोलंदाजी शैली त्याला इतरांपेक्षा वेगळे बनवते.
त्याची अनोखी गोलंदाजी शैलीमुळे त्याला स्विंग उशीरा निर्माण करता येतो आणि तेच फलंदांना आव्हानात्मक ठरते.
पण पूर्वी त्याच्या शैलीमुळे त्याच्या शरीरावर फार ताण येत होता, याचं निरीक्षण माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी केले. त्यासाठी काय बदल केले हे देखील त्यांनी सांगितलं.
त्यानंतर त्याची शैली बदलण्याचा प्रयत्न केला, पण त्यामुळे गोलंदाजीचा वेगही कमी झाला.
त्यानंतर त्याच्यासाठी खास फिटनेस आणि प्रशिक्षण योजना तयार करण्यात आली.
ज्याप्रमाणे विराट कोहली फिट होता, त्याप्रमाणे बुमराहनेही हे बदल स्वीकारले.
त्याने बर्गर, पिझ्झा, मिल्कशेक अशा त्याच्या आवडणाऱ्या पदार्थांपासून स्वत:ला दूर केलं आणि एक हेल्दी डाएट स्वीकारलं.
त्याची गोलंदाजी शैली आजही अनोखी असून तो आता भारताचा प्रमुख गोलंदाज बनला आहे.