Pranali Kodre
सचिन तेंडुलकरची पत्नी डॉ. अंजली तेंडुलकर यांनी नवी गुंतवणूक केली आहे.
अंजली तेंडुलकर यांनी विरारमध्ये नवं अपार्टमेंट खरेदी केलं आहे.
विरारमधील हा फ्लॅट पेनिन्सुला हाइट्सच्या तिसऱ्या मजल्यावर आहे. हा फ्लॅट ३९१ चौ. फूट क्षेत्रफळ आहे.
Zapkey.com द्वारे मिळालेल्या मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार या घरासाठी अंजली तेंडुलकर यांनी ३२ लाख रुपये मोजले आहेत.
मालमत्ता नोंदणी ३० मे २०२५ रोजी झाली असल्याचं दस्तऐवजांत नमूद आहे.
फ्लॅटसाठी १.९२ लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरलं आहे. महिला गृहखरेदीदार म्हणून अंजली तेंडुलकर यांना १% सवलत मिळाली आहे.
स्थानिक दलालांच्या मते, विरारमध्ये घरांचे दर ६ हजार ते ९ हजार रुपये प्रति चौ. फूट आहेत. विरार हा मुंबई महानगर प्रदेशाचा (MMR) महत्वाचा भाग असून जलद गतीने विकसित होत आहे.