Aarti Badade
झोपेचा अभाव, तणाव, अयोग्य आहार आणि पोषणतत्वांची कमतरता यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे होऊ शकतात.
पोषक तत्वांनी भरपूर आहार घेतल्याने त्वचेला बळकटी मिळते आणि काळी वर्तुळे दिसणे कमी होते.
हे जीवनसत्त्व रक्ताभिसरण सुधारतात, त्वचेला उजळवतात आणि डोळ्यांखालील काळपटपणा दूर करतात.
व्हिटॅमिन ए आणि सीयुक्त पपई त्वचेला उजळ करते आणि पेशींचे पुनरुत्पादन वाढवते.
टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंट्स असून ते त्वचेचे नुकसान कमी करतात आणि वर्तुळे कमी करतात.
लोहाची कमतरता ही काळ्या वर्तुळांची प्रमुख कारणांपैकी एक आहे – पालक हे त्यासाठी उत्तम उपाय आहे.
ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्स सूज कमी करतात व त्वचेला लवचिकता देतात.
हळदीचे सेवन डोळ्याभोवतीची सूज आणि काळसरपणा कमी करण्यात मदत करते.
काळी वर्तुळे कायमस्वरूपी टाळायच्या असतील तर झोप, आहार, आणि तणाव नियंत्रण याकडे लक्ष द्या. काही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.