30 दिवस उपाशपोटी 'या' ३ फळांचा ज्यूस पिण ठरतो हेल्थचा सुपरडोस!

Anushka Tapshalkar

रोगप्रतिकारशक्ती वाढते

आवळ्यातील व्हिटॅमिन C, बीटातील अँटिऑक्सिडंट्स आणि गाजरातील बीटा-कॅरोटीन शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतात. सर्दी-खोकला होण्याची शक्यता कमी होते.

Immunity 

|

sakal

त्वचा होते ग्लोइंग

आवळा आणि गाजर कोलेजन वाढवतात, तर बीट रक्ताभिसरण सुधारते. यामुळे त्वचेचा नैसर्गिक ग्लो, टवटवी आणि तरुणपणा टिकून राहतो.

Glowing skin

|

sakal

पचन सुधारते व डिटॉक्सिफिकेशन

आवळा आम्लपित्त संतुलित करतो, बीट यकृताचे डिटॉक्स करते आणि गाजरातील फायबर पोट साफ ठेवते. फुगणे, अपचन कमी होते.

Improves digestion |

sakal

हिमोग्लोबिन वाढते

बीट आणि गाजरातील आयर्न-फोलेट लाल रक्तपेशी वाढवतात. आवळा आयर्नचे शोषण वाढवतो. थकवा, कमजोरी कमी होऊन ऊर्जा वाढते.

Hemoglobin Levels | sakal

वजन कमी करण्यात मदत

कॅलरी कमी आणि पोषक जास्त असल्याने हा ज्यूस पोट भरलेले ठेवतो. आवळा मेटाबॉलिझम वाढवतो व फॅट ब्रेकडाउनला मदत करतो.

Weight Loss

|

sakal

हृदयाचे आरोग्य सुधारते

बीटातील नायट्रेट्स व अँटिऑक्सिडंट्स रक्तदाब कमी करण्यात मदत करतात. रक्तप्रवाह सुधारतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

heart health

|

sakal

त्वचा, डोळे आणि केसांसाठी उपयुक्त

गाजरातील व्हिटॅमिन A डोळ्यांचे आरोग्य सुधारते, बीट त्वचेला गुलाबी चमक देते आणि आवळा केसांसाठी सुपरफूड मानले जाते.

जेवणानंतर अजिबात करू नका 'या' ७ चुका

Mistakes to Avoid After Eating Any Meal

|

sakal

आणखी वाचा