30 दिवस रात्रीचं जेवण बंद केलं तर शरीरात नेमकं काय होतं?

Vinod Dengale

रात्रीचं जेवण बंद

30 दिवस रात्रीच जेवण बंद केल्यास शरीरात अनेक मोठे बदल होऊ शकतात.

No dinner

|

eSakal

पहिले 3-4 दिवस

सुरुवातीला भूक, चिडचिड आणि थकवा जाणवू शकतो. कारण शरीर रात्री अन्न मिळण्याची सवय बदलत असते.

Tiredness

|

eSakal

चरबी

काही दिवसांनी शरीर साठवलेली चरबी ऊर्जा म्हणून वापरू लागते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.

|

eSakal

ऑटोफॅजी

दीर्घकाळ अन्न न मिळाल्यास शरीर जुन्या आणि खराब पेशी साफ करण्याची प्रक्रिया सुरू करते. यालाच ऑटोफॅजी म्हणतात.

BodyCells

| esakal

पचनसंस्थेला आराम

रात्री जेवण न केल्याने पोट, यकृत आणि आतड्यांना जास्त वेळ विश्रांती मिळते. त्यामुळे पचन सुधारू शकते.

Relaxation Rituals

|

eSakal

झोप

हलके पोट असल्याने शांत झोप लागण्यास मदत होते. तसेच सकाळी उठल्यावर शरीर अधिक ताजेतवाने वाटू शकते.

Sleep

|

esakal

त्वचा

काही लोकांमध्ये त्वचा अधिक स्वच्छ आणि तजेलदार दिसू शकते. शरीरातील सूज कमी होण्यासही मदत मिळू शकते.

SkinGlow

|

eSakal

सगळ्यांसाठी नाही

गर्भवती महिला, गंभीर आजार असलेले रुग्ण आणि जास्त शारीरिक श्रम करणाऱ्यांनी हे करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

preganant woman

| esakal

महत्त्वाची गोष्ट

रात्री जेवण टाळायचं असेल तर दिवसभर पौष्टिक आहार घेणं आवश्यक आहे. जेवण चुकवल्याने रक्तातील साखर अस्थिर होणे, भूक जास्त वाढणे, नंतर जास्त खाणे अशा समस्या येतात.

Eat Healthy Diet | esakal

डॉक्टरांचा सल्ला

ही स्टोरी सामान्य माहितीवर आहे. आपल्या आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे नेहमीच सुरक्षित असते.

Doctor's Advice |

eSakal

महाराष्ट्राची चिंता मिटली? उजनीपासून कोयनापर्यंत कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

Water Crisis Over? Ujani, Koyna & Major Dams Water Levels update

|

esakal

हेही वाचा