31 डिसेंबर पार्टीसाठी परफेक्ट! झणझणीत महाराष्ट्रीयन मटण खरड्याची खास रेसिपी

Aarti Badade

पार्टीसाठी काहीतरी झणझणीत?

३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी काहीतरी वेगळं आणि चविष्ट शोधत असाल, तर अस्सल महाराष्ट्रीयन मटण खरडा (Mutton Kharda) हा सर्वोत्तम पर्याय आहे.

Mutton Kharda

|

Sakal

मुख्य साहित्य (Ingredients)

५०० ग्रॅम मटण, भरपूर हिरव्या मिरच्या, लसूण, कोथिंबीर, सुकं खोबरं, आले, जिरे, हळद, मीठ, तेल आणि गरम मसाला.

Mutton Kharda

|

Sakal

मटण शिजवून घ्या

कुकरमध्ये तेल, कांदा, आले-लसूण पेस्ट, हळद आणि मीठ घालून मटण शिजवून घ्या. शिजल्यावर मटण वेगळे करा आणि मटणाचा अर्क (Stock) बाजूला ठेवा.

Mutton Kharda

|

Sakal

तिखट 'खरडा' तयार करा

मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, सुकं खोबरं, कोथिंबीर, जिरे आणि आले घेऊन थोडे पाणी घालून जाडसर वाटून घ्या. हाच या रेसिपीचा मुख्य मसाला आहे.

Mutton Kharda

|

Sakal

मसाला खमंग परता

कढईत तेल गरम करून तयार केलेला खरडा मसाला टाका. मसाला तेल सुटेपर्यंत आणि कोरडा होईपर्यंत खमंग परतून घ्या.

Mutton Kharda

|

Sakal

मटण आणि मसाल्याचा संगम

परतलेल्या मसाल्यात शिजवलेले मटण आणि थोडा स्टॉक घाला. गरम मसाला, मीठ आणि चव संतुलित करण्यासाठी चिमूटभर साखर घालून मिश्रण अर्ध-सुके (Semi-dry) होईपर्यंत शिजवा.

गरमागरम सर्व्ह करा!

वरतून कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून हा झणझणीत मटण खरडा गरमागरम तांदळाची किंवा बाजरीची भाकरी आणि चपातीसोबत सर्व्ह करा.

Mutton Kharda

|

Sakal

31st पार्टी मेनू हिट ठरणार! ताटात पडताच फस्त होईल अशी कुरकुरीत कोलंबी फ्राय

Kolambi Fry Recipe

|

Sakal

येथे क्लिक करा