Aarti Badade
कोळंबी साफ करायला थोडा वेळ लागतो, पण तव्यावर फ्राय व्हायला अवघी काही मिनिटे पुरेशी असतात. ही रेसिपी सीफूड शौकीनांसाठी एक पर्वणीच आहे!
Kolambi Fry Recipe
Sakal
साहित्य: अर्धा किलो कोळंबी, आले-लसूण पेस्ट, मालवणी किंवा घरगुती काळा मसाला, तांदळाचे पीठ, हळद, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ.
Kolambi Fry Recipe
Sakal
कोळंबी स्वच्छ साफ करून धुवून घ्या. कोळंबीची शेपटी तशीच ठेवल्याने ती तळल्यानंतर अधिकच आकर्षक आणि सुंदर दिसते.
Kolambi Fry Recipe
Sakal
कोळंबीला हळद, मीठ आणि लिंबाचा रस चोळून अर्धा तास मॅरिनेट करा. यामुळे कोळंबीला छान चव येते. मॅरिनेशननंतर सुटलेले जास्तीचे पाणी काढून टाका.
Kolambi Fry Recipe
Sakal
आता कोळंबीला आले-लसूण पेस्ट आणि तिखट मालवणी मसाला व्यवस्थित चोळून घ्या. यामुळे कोळंबी आतून चटपटीत आणि चविष्ट लागते.
Kolambi Fry Recipe
Sakal
एका पॅनमध्ये तेल चांगले गरम करा. प्रत्येक कोळंबी तांदळाच्या पिठात घोळवून गरम तेलात सोडा. ५ मिनिटांनी बाजू पलटी करून दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्या.
Kolambi Fry Recipe
Sakal
छान कुरकुरीत झालेली कोळंबी बाहेर काढून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर पेरा. ही कुरकुरीत कोळंबी भाकरी किंवा वरण-भातासोबत अतिशय चविष्ट लागते!
Kolambi Fry Recipe
Sakal
Best Chicken Tikka Recipe in Marathi
Sakal