Human Teeth Facts : आपल्या तोंडात खरोखर ३२ दात असतात का?

Sandeep Shirguppe

t३२ दातांचा आकडा खरा आहे का?

होय! प्रौढ व्यक्तीच्या तोंडात साधारणपणे ३२ कायमस्वरूपी दात असू शकतात. मात्र, प्रत्येकाच्या तोंडात ३२ दात असतीलच असे नाही.

Human Teeth Facts

|

Sakal

लहान मुलांचे किती दात असतात?

लहान मुलांच्या तोंडात एकूण २० दुधाचे दात असतात. हे दात साधारण सहा महिन्यांपासून येण्यास सुरुवात होते.

Teeth Care Tips | Sakal

प्रौढ व्यक्तींचे दात कधी पूर्ण होतात?

साधारण १२ ते १३ वर्षांपर्यंत बहुतेक कायमस्वरूपी दात येतात. मात्र, अक्कलदाढ येण्यास अधिक काळ लागू शकतो.

Teeth Care Tips | Sakal

३२ दातांमध्ये अक्कलदाढीचाही समावेश असतो का?

होय! वरच्या आणि खालच्या जबड्यात प्रत्येकी दोन अशा एकूण चार अक्कलदाढी असतात. त्यांच्यासह दातांची संख्या ३२ होते.

Teeth Care Tips | Sakal

अक्कलदाढ प्रत्येकालाच येते का?

नाही! काही लोकांना अक्कलदाढ येतच नाही. तर काहींच्या अक्कलदाढ जबड्यातच अडकून राहतात किंवा अपुऱ्या वाढतात.

dental care tips for healthy teeth and gums

दातांचे प्रकार किती असतात?

मानवी दातांचे चार प्रमुख प्रकार आहेत. पटाशीचे दात अन्न कापतात, सुळे अन्न फाडतात, तर उपदाढा आणि दाढा अन्न चावून बारीक करतात.

teeth | sakal

काही लोकांचे २८ दातच का असतात?

अनेक प्रौढ व्यक्तींना अक्कलदाढ येत नाही किंवा ती काढावी लागते. त्यामुळे त्यांच्या तोंडात २८ दात असू शकतात.

teeth | sakal

दातांची संख्या महत्त्वाची की त्यांचे आरोग्य?

दातांची संख्या २८ असो किंवा ३२, त्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. दिवसातून दोनदा दात घासणे, नियमित तपासणी आणि तोंडाची स्वच्छता राखणे आवश्यक आहे.

teeth | sakal
आणखी पाहा...