सकाळ डिजिटल टीम
ब्राह्मोस हे भारताचे स्वनातीत क्षेपणास्त्र आहे. मॅक 2.5 ते 2.8 वेग (सुमारे 3430 किमी/तास) असलेले हे क्षेपणास्त्र पाणबुडी, जहाज, विमान व जमिनीवरून डागता येते.
ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड ही भारताच्या DRDO आणि रशियाच्या NPO Mashinostroyenia यांच्या संयुक्त सहकार्यातील कंपनी आहे.
११ मे २०२५ रोजी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते लखनौ येथील ब्राह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती केंद्राचे उद्घाटन झाले. हे केंद्र आधुनिक युद्धसामग्री निर्मितीचे प्रमुख केंद्र ठरेल.
सुरुवातीला ८०-१०० क्षेपणास्त्रांची वार्षिक निर्मिती होईल, परंतु पुढे १००-१५० क्षेपणास्त्रांची क्षमता असलेले केंद्र उभारले जाईल.
हलक्या ब्राह्मोसचे वजन १२९० किलो, तर मोठ्या क्षमतेच्या क्षेपणास्त्राचे वजन २९०० किलो आहे. सुरुवातीला ४०० किमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे तयार होतील.
या केंद्रात टायटॅनियम व सुपर अॅलॉय वापरून ‘एरोस्पेस दर्जाचे’ साहित्य तयार केले जाईल, जे संरक्षण प्रणालींसाठी महत्त्वाचे आहे.
उत्तर प्रदेश हा तमिळनाडूनंतर दुसरा राज्य आहे जिथे डिफेन्स कॉरिडॉर विकसित होत आहे. १६०.४० हेक्टरमध्ये हा कॉरिडॉर उभा राहणार आहे.