Vinod Dengale
1 एप्रिलपासून कर्ज, क्रेडिट स्कोअर आणि नॉमिनी संदर्भातील काही महत्त्वाचे नियम बदलले आहेत, जे कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक ठरणार आहेत.
आता CIBIL स्कोर दर महिन्याऐवजी दर 7 दिवसांनी अपडेट होणार आहे, त्यामुळे वेळेवर EMI भरल्यास तुमचा स्कोअर लवकर सुधारू शकतो.
मात्र, हप्ते उशिरा भरल्यास त्याचा नकारात्मक परिणामही लगेच दिसणार आहे, त्यामुळे वेळेवर पेमेंट करणे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.
नव्या नियमांनुसार फ्लोटिंग व्याजदरावर घेतलेल्या होम, कार, पर्सनल आणि एज्युकेशन लोनवर प्रीपेमेंट किंवा फोरक्लोजर चार्ज आकारला जाणार नाही.
त्यामुळे आता कर्ज वेळेआधी फेडल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही, ज्यामुळे ग्राहकांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
आता बँक खाते आणि लॉकरसाठी जास्तीत जास्त 4 नॉमिनी जोडण्याची सुविधा देण्यात आली आहे, ज्यामुळे कुटुंबीयांना भविष्यातील व्यवहार सोपे होतील.
गोल्ड मेटल लोनसाठी परतफेडीची मुदत 180 दिवसांवरून 270 दिवस करण्यात आली असून, यामुळे ज्वेलरी व्यवसायिकांना कॅश फ्लो व्यवस्थापनात मदत होईल.
विशेष म्हणजे, चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना आता कमी व्याजदरात कर्ज मिळण्याची शक्यता अधिक वाढली आहे.
IPL First Ball Mystery Revealed. It Wasn’t Sachin or Kohli!
eSakal