Swadesh Ghanekar
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती होण्याची इच्छा बीसीसीआयकडे व्यक्त केली आहे.
विराटने १२३ कसोटी सामन्यांत ४६.५८ च्या सरासरीने ९२३० धावा केल्या आहेत. त्यात ३० शतकं व ३१ अर्धशतकं आहेत.
विराट कोहलीने कसोटीतून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती बीसीसीआयने केली आहे.
रोहित शर्मानंतर विराटने निवृत्त घेतल्यास टीम इंडियाची आगामी दौऱ्यावर डोकेदुखी वाढू शकते.
विराट कोहलीने कसोटीतून निवृत्त होण्याची ही योग्य वेळ नाही. त्यामागची ४ कारणं...
कसोटी संघात विराट कोहली हाच एक अनुभवी खेळाडू आहे आणि ड्रेसिंग रुममध्ये त्याच्यासारख्या लिडरची गरज आहे.
विराटची इंग्लंडमध्ये दमदार कामगिरी राहिली आहे. त्याने १७ सामन्यांत १०९६ धावा केल्या आहेत. सचिन, राहुल व गावस्कर हे त्याच्या पुढे आहेत.
इंग्लंडविरुद्ध सर्व फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा विराट ( २६३७) दुसरा भारतीय फलंदाज आहे. राहुल द्रविड ( २६४५) अव्वल आहे.
३६ वर्षांचा विराट कोहली अजूनही चांगला तंदुरुस्त आहे आणि अनेक युवा खेळाडू त्याला आदर्श मानतात.
विराटला कसोटीत दहा हजार धावांचा टप्पा गाठण्यासाठी ७७० धावाच हव्या आहेत, तो इंग्लंड दौऱ्यावर हा पराक्रम करू शकतो.