Swadesh Ghanekar
रोहित शर्माने काही दिवसांपूर्वी कसोटीतून निवृत्ती घेतली होती, आता विराटनेही सोमवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले.
विराटला बीसीसीआयने त्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे सांगितले होते. पण, विराट त्याच्या निर्णयावर ठाम राहिला आहे.
३६ वर्षीय कोहलीने १२३ कसोटी क्रिकेट सामन्यांत ४६.८५ च्या सरासरीने ९२३० धावा केल्या आहेत.
त्याने मागील पाच वर्षांत ३७ सामन्यांत १९९० धावा केल्या आणि त्याची सरासरी ही खूपच खाली आली होती.
साई सुदर्शनने २९ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३९.९३ च्या सरासरीने १९५७ धावा केल्या आहेत. त्यात ७ शतकं व ५ अर्धशतकं आहेत.
केरळच्या या फलंदाजाने ४३ प्रथम श्रेणी सामन्यांत ४१.३९च्या सरासरीने ६ शतकं व १७ अर्धशतकांसह २८१५ धावा केल्या आहेत.
याचाही प्रथम श्रेणी क्रिकेटमधला रेकॉर्ड चांगला आहे. ५६ सामन्यांत ७ शतकं व १५ अर्धशतकांसह त्याने २८६७ धावा केल्या आहेत.
भारतासाठी कसोटीत त्रिशतक झळकावणाऱ्या नायरने ११४ प्रथम श्रेणी सामन्यांत ४९.१६च्या सरासरीने ८२११ धावा केल्या आहेत. २३ शतकं व ३६ अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत.
याने ६ कसोटी सामने खेळले आहेत आणि ५४ प्रथम श्रेणी सामन्यांत १६ शतकं व १४ अर्धशतकांसह ४५९३ धावा नावावर आहेत.