सकाळ डिजिटल टीम
स्क्रिन टाईम वाढल्यामुळे सध्या अनेकांना कमी वयातच चष्मा लागत आहे. दुरचं धुसर झाल्यासारखं दिसतं.
स्क्रीन टाईम वाढल्यामुळे कमी वयातच चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
दोन्ही तळहात एकमेकांवर घासून उबदार करा आणि उबदार तळहात डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.
क्लॉकवाइज आणि अँटी क्लॉकवाइज डोळे फिरवून दूर आणि जवळच्या वस्तूंवर नजर स्थिर करा. यामुळे डोळ्यांचा व्यायाम होतो.
स्क्रीनवर काम करताना डोळ्यांना ब्रेक देऊन उघडझाप करा. यामुळे डोळे ओलसर राहण्यास मदत होते.
त्राटक ध्यानाने डोळ्यांच्या आरोग्याची देखभाल केली जाऊ शकते. योगतज्ज्ञाकडून त्राटक शिकून त्याचा नियमित अभ्यास करा.
दुरदर्शन धुसर दिसण्याची समस्या असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचे आहे.