पुजा बोनकिले
ध्यान ही एक अशी क्रिया आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती आपल्या मनाला एकाग्र करण्यासाठी आणि विचारांना दिशा देण्यासाठी प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न करते.
दररोज मेडिटेशन केले तर तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी वाटते.
पण मेडिटेशन केल्याने आपल्या मेंदूत कोणत्या प्रकारचे बदल होतात हे जाणून घेऊया.
काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की ध्यान मेंदूच्या काही भागांच्या मज्जासंस्थेवर देखील परिणाम करते आणि मेंदूचा आकार तुलनेने मोठा करते.
ध्यान मेंदूतील त्या भागांना बळकट करण्यास मदत करते जे लक्ष केंद्रित करण्यासाठी जबाबदार असतात.
मेडिटेशन केल्याने ताण तणाव कमी होतो.
ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन ही एक ध्यान प्रक्रिया आहे ज्यामध्ये मेंदूची संपूर्ण क्रिया संतुलित होते. यामध्ये मेंदूतील ग्लोबल अल्फा लहरींची सुसंगतता वाढते, कपाळाच्या भागात रक्त प्रवाह वाढतो
काही प्रकारचे ध्यान मेंदूच्या डिफॉल्ट मोड नेटवर्क (DFM) ला बळकटी देते. अंतर्दृष्टी आणि सर्जनशीलतेमध्ये DFM महत्त्वाची भूमिका बजावते आणि मानसिक आरोग्य आणि वैयक्तिक वाढीमध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावते.