Anushka Tapshalkar
आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. यंदा 10 जुलै 2025 रोजी गुरु पौर्णिमा आहे. या दिवशी गुरुंचे आशीर्वाद घेतले जातात आणि महर्षि वेदव्यासांची जयंती म्हणूनही हा दिवस साजरा होतो.
हिंदू धर्मात दान करणे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते. गुरु पौर्णिमेच्या दिवशी काही विशिष्ट वस्तूंचे दान केल्याने धन-धान्यात वाढ होते आणि जीवनात सुख-समृद्धी येते, अशी मान्यता आहे.
गुरु पौर्णिमेच्या दिवशी पिवळा रंग खूप शुभ मानला जातो. हा रंग पवित्रता आणि समर्पणाचे प्रतीक आहे. धोतर, कुर्ता यांसारख्या पिवळ्या रंगाच्या वस्त्रांचे दान करणे शुभ फळे देते.
रामायण, भगवद्गीता किंवा ध्यान साधनेची पुस्तके यांसारख्या धार्मिक ग्रंथांचे दान करणे या दिवशी अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे जीवनात प्रगती होते, अशी धारणा आहे.
गुरु पौर्णिमेच्या दिवशी फळांचे दान करणे खूप शुभ मानले जाते. याशिवाय, अन्न आणि मिठाईचे दान करणे देखील अक्षय पुण्याची प्राप्ती करून देते असे म्हटले जाते.
गुरु पौर्णिमेला चांदी किंवा ताम्रपात्राचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. चांदीचा संबंध चंद्राशी आहे. चांदीचे दान केल्याने आयुष्य वाढते आणि सुख-सौभाग्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे.
या दिवशी आपल्या क्षमतेनुसार गुरुंना दक्षिणा म्हणून धन, वस्त्र, अन्न किंवा सोने-चांदीचे दान करावे.
जर मोठे दान करणे शक्य नसेल, तर एक लोटा पाणी, काही फुले आणि आदरपूर्वक प्रणाम करणे हे देखील सर्वात श्रेष्ठ दान मानले गेले आहे.