पुजा बोनकिले
आहारात काही भाज्यांचा समावेश केल्यास यूरिक अॅसिड नियंत्रित राहू शकते.
उन्हाळ्यात अनेक लोकांना यूरिक अॅसिडचा त्रास होतो.
उन्हाळ्यात युरिक अॅसिड कमी करण्यासाठी पुढील भाज्या खाऊ शकता.
टोमॅटो व्हिटॅमिन सीचे उत्तम स्त्रोत आहे. याचे सेवन केल्याने युरिक अॅसिडची पातळी कमी होते.
उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने केवळ हायड्रेटेड राहण्यास मदत होतेच, पण काकडी खाल्ल्याने वजन कमी होण्यास आणि शरीरातील युरिक अॅसिडची पातळी कमी होण्यास मदत होते.
शरीरातील युरिक अॅसिडची पातळी कमी करण्यासाठी लिंबाचा रस हा एक उत्तम घटक आहे. तुम्ही एका ग्लास पाण्यात लिंबाचा रस मिसळून ते पिऊ शकता.
दुधी भोपळ्याची भाजी किंवा पदार्थ खाल्यास युरिक अॅसिडची पातळी कमी होते.