पोटाच्या विकारांनी हैराण आहात? औषधं विसरा! रोज फक्त 10 मिनिटे करा ‘ही’ योगासने

Aarti Badade

अपचन त्रास

खाण्याच्या चुकीच्या वेळा आणि तेलकट आहारामुळे अनेकदा पोट फुगणे, गॅसेस आणि करपट ढेकर येण्याचा त्रास होतो. त्यासाठी योगासने करणे आवश्यक आहे.

Yoga for acidity

|

Sakal

अर्ध मत्स्येंद्रासन

हे आसन केल्याने पोटाला हलका मुरडा बसतो, ज्यामुळे पचनसंस्थेतील अवयव सक्रिय होतात. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

Yoga for acidity

|

Sakal

सेतूबंधासन

सेतूबंधासनामुळे पोटातील स्नायूंवर चांगला ताण येतो. हे आसन केवळ पचनाच्या तक्रारीच दूर करत नाही, तर पाठ आणि कंबरदुखीवरही गुणकारी ठरते.

Yoga for acidity

|

Sakal

त्रिकोणासन

त्रिकोणासन केल्याने आतड्यांचा व्यायाम होतो. यामुळे पोटाचे स्नायू ताणले जातात आणि पचन सुलभ होते. पोटाचा घेर कमी करण्यासाठीही हे आसन उपयुक्त आहे.

Yoga for acidity

|

Sakal

उत्तान श्वानासन

ब्लोटिंग आणि गॅसेसच्या समस्येवर उत्तान श्वानासन हा उत्तम उपाय आहे. हे आसन पोटाचे स्नायू रिलॅक्स करते, ज्यामुळे ढेकर येणे आणि पोट जड वाटणे कमी होते.

Yoga for acidity

|

Sakal

पवनमुक्तासन

पवनामुक्तासन नावाप्रमाणेच पोटातील गॅसेस मोकळे करण्यास मदत करते. पोटाच्या खालच्या भागावर दाब आल्यामुळे अपचन आणि ब्लोटिंगची समस्या झटपट दूर होते.

Yoga for acidity

|

sakal

योगा करताना टिप्स

योगासने नेहमी सकाळी रिकाम्या पोटी करावीत. श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करा. सुरुवातीला तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सराव करा.

Yoga for acidity

|

Sakal

आरोग्यदायी बदलाची सुरुवात

नियमित योगासोबतच भरपूर पाणी प्या आणि वेळेवर जेवणाची सत्य पाळा. तुमची पचनसंस्था सुदृढ असेल, तरच तुम्ही उत्साही राहाल!

Yoga for acidity

|

Sakal

डायबिटीज असणाऱ्यांनी 'हे' पदार्थ खाऊच नये! तज्ज्ञांनी सांगितली लिस्ट

Foods to avoid in diabetes

|

Sakal

येथे क्लिक करा