डायबिटीज असणाऱ्यांनी 'हे' पदार्थ खाऊच नये! तज्ज्ञांनी सांगितली लिस्ट

Aarti Badade

रक्तातील साखरेवर नियंत्रण

मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केवळ गोड पदार्थच नाही, तर आपल्या रोजच्या आहारातील काही पदार्थ साखरेची पातळी वाढवू शकतात.

Foods to avoid in diabetes

|

Sakal

साखर आणि गोड पेये

सोडा, एनर्जी ड्रिंक्स, पॅकबंद फळांचा रस आणि फ्लेवर्ड चहा-कॉफी पिणे टाळा. या पेयांमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढू शकते.

Foods to avoid in diabetes

|

Sakal

मैद्याचे पदार्थ

पांढरा ब्रेड, पांढरा भात, पास्ता आणि मैद्यापासून बनवलेले बिस्किटे किंवा केक खाणे टाळावे. हे पदार्थ रक्तातील ग्लुकोजची पातळी झपाट्याने वाढवतात.

Foods to avoid in diabetes

|

Sakal

स्टार्चयुक्त भाज्या

बटाटा, मका (Corn) आणि मटार यांसारख्या भाज्यांमध्ये स्टार्च आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. मधुमेहींनी या भाज्यांचे सेवन मर्यादित ठेवावे किंवा टाळावे.

Foods to avoid in diabetes

|

Sakal

तळलेले प्रक्रिया केलेले अन्न

भजी, वडे, चिप्स आणि इन्स्टंट नूडल्समध्ये सॅच्युरेटेड फॅट्स आणि ट्रान्स फॅट्स असतात. हे पदार्थ केवळ साखरेची पातळीच नाही, तर रक्तातील कोलेस्ट्रॉलही वाढवतात.

Foods to avoid in diabetes

|

sakal

फळ

आंबा आणि चिकू यांसारखी अति गोड फळे मर्यादित खावीत. तसेच मनुका आणि खजूर यांसारखा सुका मेवा टाळलेला बरा, कारण त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण खूप जास्त असते.

Foods to avoid in diabetes

|

Sakal

काय खावे?

आहारात फायबरयुक्त पालेभाज्या, कमी साखर असलेली फळे (उदा. सफरचंद, पेरू) आणि संपूर्ण धान्य जसे की नाचणी, ज्वारी आणि ओट्स यांचा समावेश करावा.

Foods to avoid in diabetes

|

Sakal

लहान बदल, मोठा फायदा

प्रक्रिया केलेले पदार्थ टाळून नैसर्गिक आणि घरगुती अन्नाला प्राधान्य द्या. नियमित व्यायाम आणि योग्य आहार हीच मधुमेहावर नियंत्रण मिळवण्याची गुरुकिल्ली आहे!

Foods to avoid in diabetes

|

Sakal

अचानक बीपी लो होण्यामागची ‘ही’ 3 मुख्य कारणे दुर्लक्ष करू नका!

Symptoms of Low Blood Pressure

|

Sakal

येथे क्लिक करा