सावध व्हा! रोजच्या ‘या’ सवयी मुळव्याधाला देतात थेट आमंत्रण

Aarti Badade

मुळव्याध : एक वेदनादायक समस्या

मुळव्याध होण्यामागे केवळ अनुवंशिकता नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनातील काही चुकीच्या सवयी देखील तितक्याच जबाबदार असतात.

Piles Causes

|

Sakal

कमी फायबर असलेला आहार

आहारात हिरव्या पालेभाज्या आणि फळांचा अभाव असल्यास पचनशक्ती कमकुवत होते, ज्यामुळे मुळव्याधाचा धोका वाढतो.

Piles Causes

|

Sakal

पाणी कमी पिण्याची सवय

दिवसभरात पुरेसे पाणी न प्यायल्याने शरीरात कोरडेपणा येतो आणि बद्धकोष्ठता (Constipation) वाढते, जे मुळव्याधाचे मुख्य कारण आहे.

Piles Causes

|

Sakal

तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे अतिसेवन

जास्त तळलेले, तिखट आणि गरम मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पचन संस्थेवर ताण येतो आणि शौचाच्या वेळी जळजळ होऊ शकते.

Piles Causes

|

Sakal

तासनतास बैठी कामे करणे

एकाच जागी जास्त वेळ बसून काम केल्याने पोटाच्या खालच्या भागावर दाब येतो, ज्यामुळे रक्तवाहिन्या फुगतात आणि मुळव्याध होतो.

Piles Causes

|

Sakal

कॅफिन आणि कॉफीचा अतिरेक

जास्त प्रमाणात कॉफी पिण्यामुळे मल त्यागण्याची नैसर्गिक प्रक्रिया मंदावते, परिणामी शौचाला त्रास होऊन मुळव्याध बळावू शकतो.

Piles Causes

|

Sakal

शौचाला जोर लावणे आणि वजन उचलणे

शौचाच्या वेळी जास्त जोर लावणे किंवा क्षमतेपेक्षा जास्त जड वजन उचलणे यामुळे गुदद्वाराच्या नसांवर ताण येतो आणि समस्या गंभीर होते.

Piles Causes

|

Sakal

वेळीच खबरदारी घ्या!

निरोगी जीवनशैली, भरपूर पाणी आणि सकस आहार हीच मुळव्याधावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे. त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Piles Causes

|

Sakal

झोपण्यापूर्वी नाभीत तेल? आयुर्वेद सांगतो आश्चर्यकारक फायदे

Navel Therapy Castor Oil Benefits

|

Sakal

येथे क्लिक करा