फक्त कॅल्शियम पुरेसं नाही! हाडं मजबूत ठेवण्यासाठी 'या' सवयीही आहेत तितक्याच महत्त्वाच्या

Anushka Tapshalkar

कमकुवत हाडं

आजकाल चुकीची जीवनशैली, पोषणाचा अभाव आणि व्यायामाची कमतरता यामुळे कमी वयातही हाडे कमकुवत होत आहेत. मात्र, काही सोप्या नैसर्गिक सवयी अंगीकारून हाडे मजबूत ठेवता येऊ शकतात.

Weak Bones

|

sakal

कॅल्शियमयुक्त पदार्थ

दूध, दही, पनीर आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर कॅल्शियम असते. हे हाडांच्या मजबुतीसाठी अत्यंत महत्त्वाचे पोषक तत्त्व आहे.

Eat Calcium Food

|

sakal

कॅल्शियमचे अति सेवन टाळा

हाडांसाठी कॅल्शियम आवश्यक असले तरी त्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे संतुलित प्रमाणातच सेवन करा.

Avoid Over Consumption of Calcium

|

sakal

रोज चालण्याची सवय

दररोज चालणे, जॉगिंग, डान्स, वेट ट्रेनिंग तसेच ताडासन, वृक्षासन आणि भुजंगासन यांसारखे व्यायाम केल्याने हाडे मजबूत राहण्यास मदत होते.

Have a Habit of Walking

|

sakal

व्हिटॅमिन D कमतरता नको

मासे, अंड्याचा पिवळा बलक, मशरूम आणि फोर्टिफाइड दूध यांचा आहारात समावेश केल्यास व्हिटॅमिन D मिळते, जे कॅल्शियम शोषण्यास मदत करते.

Avoid Vitamin D Deficiency 

|

sakal

व्हिटॅमिन D असलेले पदार्थही मर्यादित

व्हिटॅमिन D महत्त्वाचे असले तरी त्याचाही अतिरेक टाळा. योग्य प्रमाणात आणि संतुलित आहाराचा भाग म्हणूनच हे पदार्थ खावेत.

Consume Vitamin D in Limit

|

sakal

चुकीची जीवनशैली बदला

अनियमित दिनचर्या, पोषणाचा अभाव आणि चुकीच्या आहारामुळे हाडे कमकुवत होऊ शकतात. त्यामुळे आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारणे गरजेचे आहे.

Change Lifestyle 

|

sakal

नैसर्गिक उपायांना प्राधान्य

हाडांच्या आरोग्यासाठी अनावश्यक सप्लिमेंट्स किंवा औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी सवयींचा अवलंब करा

Simple Habits for Healthy Bones

|

sakal

वजन कमी करण्यासाठी आठवड्यात किती वेळ व्यायाम केला पाहिजे?

How Much Exercise Per Week for Weight Loss

|

eSakal

आणखी वाचा