Anushka Tapshalkar
निरोगी राहण्यासाठी दर आठवड्याला किती व्यायाम आवश्यक आहे? याबाबत न्यूरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांनी वैज्ञानिक माहिती शेअर केली आहे.
How much Exercise
eSakal
पूर्णपणे निष्क्रिय राहण्यापेक्षा दररोज फक्त 10–15 मिनिटे चालण्यास सुरुवात केली तरी आरोग्याचा धोका लक्षणीय कमी होतो.
Starting it Big Benefit
eSakal
दररोज 30–60 मिनिटे किंवा आठवड्याला 150–300 मिनिटे वेगाने चाला. चालण्याचा वेग साधारण 100–130 पावले प्रति मिनिट असावा.
Walking
eSakal
आरोग्याचे फायदे 2,500–3,000 पावलांपासूनच सुरू होतात. 7,000–9,000 पावले दररोज चालल्यास सर्वाधिक लाभ मिळतो.
10000 Steps not Necessary
eSakal
दररोज फक्त 5–10 मिनिटे धावले तरी मृत्यूचा धोका कमी होतो. आठवड्यात 3–5 दिवस, 20–45 मिनिटे धावणे पुरेसे आहे.
Running Benefits
eSakal
स्पर्धात्मक धावपटू नसल्यास आठवड्याला 80–100 किमीपेक्षा जास्त धावल्याने दुखापत, थकवा आणि इतर आरोग्यधोके वाढू शकतात.
Too Much Running not Always Good
eSakal
मध्यम गतीने आठवड्याला 150–300 मिनिटे किंवा जोरदार गतीने 75–150 मिनिटे सायकलिंग केल्यास हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
Cycling
eSakal
आठवड्यात 2–3 दिवस, प्रत्येकी 30–60 मिनिटे स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. यामुळे स्नायू, हाडे आणि शरीराची ताकद वाढते.sa
Strength Training
eSakal
चांगली झोप, संतुलित आहार, विश्रांतीचे दिवस आणि तणाव नियंत्रण यामुळेच व्यायामाचा पूर्ण फायदा शरीराला मिळतो.
Resting Also Important
eSakal
ही माहिती डॉ. सुधीर कुमार यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या मार्गदर्शनावर आधारित असून, वैयक्तिक आरोग्यस्थितीनुसार व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
How Long Should You Plank Every Day to lose Belly Fat
sakal