Aarti Badade
टायफॉइड हा 'Salmonella Typhi' या जीवाणूमुळे होणारा गंभीर आजार आहे. दूषित पाणी आणि अन्नाद्वारे याचा प्रसार होतो. अनेकदा या आजाराकडे दुर्लक्ष केले जाते, जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
Symptoms of typhoid
Sakal
टायफॉइडमध्ये नेहमीच खूप तीव्र ताप येतो. मात्र, प्रत्यक्षात सुरुवातीला ताप सौम्य असू शकतो. त्यासोबत डोकेदुखी किंवा थकवा जाणवल्यास लोक याला साधा व्हायरल ताप समजून दुर्लक्ष करण्याची चूक करतात.
Symptoms of typhoid
Sakal
"मला भूक लागतेय म्हणजे मला टायफॉइड असूच शकत नाही" हा मोठा गैरसमज आहे. प्रत्येक रुग्णामध्ये भूक कमी होईलच असे नाही. काही रुग्ण सुरुवातीच्या टप्प्यात जेवण करू शकतात, तरीही त्यांना संसर्ग असू शकतो.
Symptoms of typhoid
Sakal
अँटिबायोटिक्स सुरू केल्यावर २-३ दिवसांत बरे वाटू लागते, म्हणून अनेकजण औषध सोडून देतात. पण यामुळे जीवाणू पूर्णपणे नष्ट होत नाहीत आणि आजार पुन्हा बळावण्याचा धोका असतो. डॉक्टरांनी सांगितलेला पूर्ण कोर्स करणेच हिताचे असते.
Symptoms of typhoid
Sakal
टायफॉइड फक्त अस्वच्छ वस्त्यांमध्येच होतो, हा समज चुकीचा आहे. तुमचं घर कितीही स्वच्छ असलं, तरी बाहेरचे दूषित पाणी किंवा न धुतलेली भाजी यांमुळे कोणालाही या जीवाणूंचा संसर्ग होऊ शकतो.
Symptoms of typhoid
Sakal
टायफॉइडची लस काही काळासाठी संरक्षण देते, पण ती आयुष्यभराची हमी देत नाही. लस घेतलेली असली तरी स्वच्छ पाणी आणि अन्नाबाबत सावधगिरी बाळगणे नेहमीच आवश्यक असते.
Symptoms of typhoid
Sakal
टायफॉइडची लक्षणे दिसताच घरगुती उपचारांवर अवलंबून न राहता रक्त तपासणी करून घ्या. वेळेवर निदान आणि पूर्ण औषधोपचार हाच या आजारातून लवकर बरे होण्याचा एकमेव मार्ग आहे.
Symptoms of typhoid
Sakal
Causes of high cholesterol
Sakal