Aarti Badade
कोलेस्टेरॉल वाढण्यामागे प्रामुख्याने चुकीचा आहार, बैठी जीवनशैली आणि तणाव ही कारणे असतात. रक्तातील 'वाईट' कोलेस्टेरॉल वाढल्यास हृदयविकाराचा धोका निर्माण होतो.
Causes of high cholesterol
Sakal
तळलेले पदार्थ, रेड मीट, तूप आणि बिस्किटे-केक यांसारख्या ट्रान्स फॅट्सचे अतिसेवन केल्यामुळे शरीरातील 'खराब' कोलेस्टेरॉलची पातळी वेगाने वाढते.
Causes of high cholesterol
sakal
शारीरिक हालचालींचा अभाव किंवा नियमित व्यायाम न केल्यामुळे शरीरात चरबी साचते. विशेषतः पोटावरची चरबी वाढल्यास कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक वाढते.
Causes of high cholesterol
Sakal
धूम्रपानामुळे शरीरातील 'चांगले' (HDL) कोलेस्टेरॉल कमी होते आणि 'वाईट' कोलेस्टेरॉल वाढते. तसेच अति मद्यपान हे देखील हृदयविकाराला निमंत्रण देते.
Causes of high cholesterol
Sakal
कुटुंबात उच्च कोलेस्टेरॉलचा इतिहास असेल, तर तुम्हाला याचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय मधुमेह, थायरॉईड किंवा किडनीच्या आजारामुळेही कोलेस्टेरॉल वाढू शकते.
Causes of high cholesterol
Sakal
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आहारात फायबरयुक्त पदार्थ (ओट्स, फळे) समाविष्ट करा. दररोज किमान ३० मिनिटे वेगाने चालणे किंवा व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे.
Causes of high cholesterol
Sakal
वजन आटोक्यात ठेवणे आणि व्यसनांपासून दूर राहणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे. जर कोलेस्टेरॉलची पातळी जास्त असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे टाळू नका.
Causes of high cholesterol
Sakal
Blood sugar control exercise
Sakal