Anushka Tapshalkar
आज कालच्या वाढत्या महागाईत आर्थिक स्थैर्य असणे अत्यंत गरजेचे आहे.
श्रीमंत होण्यासाठी किंवा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी केवळ कष्ट पुरेसे नाही. त्यासाठी योग्य आर्थिक सवयी आणि गुंतवणूक नियोजन करणे देखील गरजेचे आहे.
तुमच्या खर्चाच्या सवयी आणि गुंतवणुकीच्या निर्णयांवर तुमच्या भविष्यातील संपत्तीचे गणित अवलंबून असते.
ब्रँडेड वस्तू आणि लाइफस्टाइल दाखवण्यासाठी जास्त पैसे खर्च करणे, गुंतवणुकीऐवजी खर्चाला प्राधान्य देणे.
फक्त कामाच्या मोबदल्यावर फोकस करणे आणि उत्पन्न वाढवण्याच्या संधी (स्केलिंग) लक्षात न घेणे.
उरलेले पैसेच बचत करणे, आधीच नियोजन करून बचत न करणे.
फक्त एक उत्पन्न स्रोत असणे. एकाच नोकरी किंवा व्यवसायावर अवलंबून राहणे, अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी न शोधणे.
आर्थिक शिक्षण जसेकी बजेटिंग, गुंतवणूक आणि संपत्ती वाढवण्याचे तंत्र न शिकणे.