संतोष कानडे
अमेरिका-इराण यांच्यात युद्धविराम झालेला असल्याने अनेक देशांनी काहीसा सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
परंतु असे काही देश आहेत, जिथे कधीही युद्ध भडकू शकतं. जगातले पाच युद्धाजन्य देश जाणून घेऊयात.
रशिया-युक्रेन यांच्यातलं युद्ध शमलं असलं तरी संपलेलं नाही. दोन्ही देशांमध्ये कधीही युद्धाचा भडका उडू शकतो.
चीन आणि तैवान यांच्यातील वाद भविष्यात मोठ्या संघर्षात बदलू शकतो. चीन तैवानला आपलाच भाग मानतो, परंतु तैवान स्वतंत्र आहे.
South China Sea मध्ये अनेक देशांत समुद्री हद्दीवरून तणाव आहे.
इराण-इस्रायल संघर्षामुळे जगाची डोकेदुखी वाढली आहे. भविष्यातही युद्ध भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Korean Peninsula मध्ये North Korea आणि South Korea यांच्यातील तणाव कायम आहे.
भारत आणि चीन या दोन देशांमध्ये सीमेवरुन वाद उफाळून येतो. तसेच भारत-पाकिस्तानमध्येही काश्मीर मुद्द्यावरुन वाद आहेच.
या सर्व देशांमध्ये राजकीय, लष्करी आणि आर्थिक कारणांमुळे परिस्थिती संवेदनशील आहे. लहानशी चूक किंवा गैरसमजही मोठ्या युद्धाला कारणीभूत ठरू शकतो.
हरममधल्या 'या' दोन इराणी महिलांमुळे मुघल साम्राज्य झालं बळकट