हरममधल्या 'या' दोन इराणी महिलांमुळे मुघल साम्राज्य झालं बळकट

संतोष कानडे

मुघल

मुघलांच्या हरममध्ये इराणी महिलांचं वर्चस्व असायचं. त्यांचं सौंदर्य, बुद्धीमत्ता आणि प्रशासकीय निर्णयक्षमता यामुळे त्यांचा प्रभाव असायचा.

इराण

मुघल बादशहांचे इराणच्या राजघराण्याची आणि उच्चभ्रू सरदारांशी जवळचे संबंध होते. त्यामुळे राजकीय भूमिका घेत तिथल्या मुलींशी मुघल लग्न करायचे.

नूरजहान

इतिहासात सर्वात प्रभावशाही इराणी महिला नूरजहान ही होती. नूरहजान ही मूळची इराणची. ती हरममध्ये केवळ राहिली नाही तर प्रत्यक्ष राज्यकारभार चालवला.

मुमताज महल

नूरजहानच्याच प्रभावामुळे तिची भाची मुमताज महल हिचा विवाह शहाजहानशी झाला. या दोन्ही महिलांनी मुघल हरममध्ये इराणी संस्कृती रुजवली.

आसफ खान

मुमताजचे वडील आसफ खान हेदेखील अत्यंत प्रभावशाली इराणी मुत्सुद्दी होते. त्यांनी शाहजहानला सत्तेवर येण्यासाठी मदत केली.

आजोबा

मुमताजचे आजोबा मिर्झा गियास बेग हे इराणमधील तेहरानचे रहिवासी होते. तिथली राजकीय परिस्थिती बिघडल्यानंतर ते कुटुंबासह भारतात आले होते.

अकबर

अकबर बादशहाने त्यांची बुद्धीमत्ता बघून त्यांना दरबारामध्ये मानाचे स्थान दिले. पुढे जहांगीरच्या काळात ते 'इतमाद-उद-दौला' म्हणजे साम्राज्याचा आधार बनले आणि पंतप्रधान झाले.

चार चाँद

मुमताजची आत्या नूरजहानने मुघल दरबारामध्ये इराणी गटाचा प्रभाव निर्माण केला होता. या दोघींमुळे मुघल साम्राज्याला चार चाँद लागले.

इराणी संस्कृती

मुघल दराबारात, महलांमध्ये आणि मुघली संस्कृतीमध्ये इराणी संस्कृतीचा मोठा प्रभाव वाढत गेला.

खाद्यपदार्थ

वास्तूकला, साहित्य, संगीत, खाद्यपदार्थ.. यात इराणी प्रभाव होता. शेवटी मुमताजच्या आठवणीत बांधलेला ताजमहल हादेखील इराणी आणि भारतीय वास्तूकलेचा संगम आहे.

नॉनव्हेज खावं की नाही? आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय?

<strong>येथे क्लिक करा</strong>