सकाळ डिजिटल टीम
मेथी दाण्यात सोडियम, पोटॅशियम, फायबर, लोह, कॅल्शियम, विटामिन डी आणि विटामिन सी असतात. हे पोषक तत्व शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.
मेथी दाण्याचे पाणी फायबरने भरपूर असते, जे पोट भरलेले ठेवते. यामुळे भूक कमी लागते आणि वजन कमी करण्यास मदत होते. हे पाणी पोटावरील चरबी जाळण्यासही मदत करते.
भिजवलेले मेथी दाण्याचे पाणी गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम देते. मेथीमधील फायबर पचनक्रिया सुधारते आणि शौचाला मदत करते.
मेथी दाण्याचे पाणी रक्तातील साखरेची पातळी कमी करते आणि डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होऊ शकते.
मेथीचे पाणी हृदयासंबंधी आजार कमी करण्यास मदत करते. ते ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते.
मेथी दाण्याचे पाणी त्वचेसाठी चांगले आहे. ते त्वचेतील अलर्जी कमी करते, पिंपल्स आणि डाग कमी करते, आणि त्वचेला पोषण आणि चमक देते.
१ चमचा मेथी दाणे १ ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून सकाळी उपाशीपोटी प्या.
याचे सेवन सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, खासकरून जर आपल्याला मेथीची अॅलर्जी असेल.