पुजा बोनकिले
रजोनिवृत्ती हा एक असा टप्पा आहे ज्यामध्ये महिलेची मासिक पाळी कायमची थांबते
महिलांना साधारणपणे ४८ ते ५१ वयोगटातील रजोनिवृत्तीचा अनुभव येतो. परंतु, प्रत्येक महिलेमध्ये रजोनिवृत्तीचे वय वेगवेगळे असू शकते.
रजोनिवृत्तीनंतर महिलांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते हे जाणून घेऊया.
रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये हृदयरोगाचा धोका वाढतो. खरंतर, रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी होते. यामुळे लिपिड पातळीत बदल होतो. यामुळे हृदयासंबंधित समस्या वाढतात.
रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये टाइप २ मधुमेहाचा धोका देखील वाढतो. रजोनिवृत्ती दरम्यान इस्ट्रोजेन हार्मोन कमी झाल्यामुळे इन्सुलिन प्रतिरोध वाढतो. यामुळे शरीराची ग्लुकोज वापरण्याची क्षमता कमी होते. यामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका वाढतो.
रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. शरीरात इस्ट्रोजेनच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ लागतात. हाडांच्या कमकुवतपणामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. त्यामुळे पाठदुखीचा तीव्र त्रास होतो.
रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये मूत्रपिंडाशी संबंधित आजारांचा धोका देखील वाढतो. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स मूत्राशयाच्या ऊतींना जाड करण्यास मदत करतात. रजोनिवृत्तीनंतर या संप्रेरकांची पातळी कमी होते, ज्यामुळे मूत्राशय कमकुवत होतो.
रजोनिवृत्तीनंतर स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी होते. चरबीच्या ऊतींमध्ये इस्ट्रोजेनचे उत्पादन वाढते, ज्यामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.