Champions Trophy खेळण्याचं 'या' ५ भारतीय खेळाडूंचं तुटलं स्वप्न

Pranali Kodre

चॅम्पियन्स ट्रॉफी

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ सज्ज झाला आहे.

icc champions trophy | sakal

भारतीय संघ

तब्बल आठ वर्षांनी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची शनिवारी घोषणा झाली.

Team India | Sakal

चर्चा

निवड झालेल्या भारतीय संघाबाबत बऱ्याच चर्चा होत आहे.

Team India | Sakal

स्वप्न तुटलं

दरम्यान, या संघात काही प्रचंड चर्चेत असलेल्या खेळाडूंना संघात संधी मिळाली नाही.त्यामुळे त्यांचे चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याचे स्वप्न तुटले, अशाच ५ खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.

Sanju Samson | Tilak Varma | Sakal

करुण नायर

करुण नायरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये ७७९ धावा करत भारतीय संघाचे दार ठोठावले होते. मात्र, त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही.

Karun Nair | Sakal

नितीश कुमार रेड्डी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अष्टपैलू खेळाने नितीश कुमार रेड्डीने सर्वांचे लक्ष वेधले होते. मात्र, त्यालाही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही.

Nitish Kumar Reddy | Sakal

मोहम्मद सिराज

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यालाही भारतीय संघात संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्याचेही चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याचे स्वप्न भंगले आहे.

Mohammed Siraj | Sakal

सूर्यकुमार यादव

भारताचा टी२० कर्णधार असूनही सूर्यकुमार यादवलाही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात स्थान मिळालेलं नाही.

Suryakumar Yadav | Sakal

संजू सॅमसन

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनलाही भारताच्या संघात चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी स्थान देण्यात आलेलं नाही.

Sanju Samson | India vs South Africa 1st T20I | Sakal

MI, CSK ला मागे टाकत 'हा' IPL संघ सलग ५ व्यांदा ठरला सर्वात पॉप्युलर

CSK vs MI | Sakal
येथे क्लिक करा