Monika Shinde
उन्हाळा सुरु झाला की अनेकांना उष्णतेचा त्रास होतो. पण तुम्हाला माहिती का? शरीरात उष्णता वाढण्याचे काय कारण आहे. चला, तर मग जाणून घेऊया
बाहेरचे तापमान जास्त असल्यामुळे शरीरातील उष्णता वाढते, ज्यामुळे घाम आणि डिहायड्रेशन होऊ शकते.
तिखट अन्न शरीरात उष्णतेची वाढ करतो. हे अन्न पचन प्रक्रियेला वेग देतं आणि त्यामुळे शरीराची उष्णता वाढते.
ताणामुळे शरीरातील हार्मोन्स बदलतात, ज्यामुळे उष्णता वाढते. चिंता आणि तणावामुळे शरीराचा तापमानही वाढू शकतो.
अधिक शारीरिक काम, जसं की व्यायाम, शरीरातील उष्णता वाढवतो. शरीराला थोडा आराम न मिळाल्यास उष्णता निर्माण होते.
ज्यावेळी पचन व्यवस्थित होत नाही, तेव्हा शरीरातील उष्णता वाढते. अपचन किंवा पचनाच्या विकारांमुळे शरीराला अधिक उष्णता होऊ शकते.