Monika Shinde
धावपळीच्या जीवनशैलीत तणाव वाढतोय? मग फक्त ५ मिनिटांचे हे उपाय करून तणाव कमी करा आणि स्वतःला द्या शांततेचा अनुभव.
५ मिनिटे शांत बसून खोल श्वास घ्या आणि हळू सोडा. श्वासावर लक्ष केंद्रित ठेवा. हे मनाला शांत करतं आणि तणाव दूर करतं.
थोडं चालणं, हात-पायांची स्ट्रेचिंग, मान हलवणं या हालचाली शरीराला आणि मनाला ताजंतवानं करतात. ५ मिनिटे पुरेशी आहेत.
तणाव असताना तुमचं आवडतं सौम्य, शांत संगीत ऐका. हेडफोन लावा, डोळे बंद करा आणि फक्त सूरात हरवून जा.
शांत ठिकाणी बसून डोळे बंद करा आणि काही मिनिटं फक्त आतल्या श्वासोच्छ्वासावर लक्ष द्या. ध्यानामुळे मन स्थिर होतं आणि तणाव कमी होतो.
एका कागदावर तीन गोष्टी लिहा ज्या तुमचं मन प्रसन्न करतात. ही सकारात्मक सवय मानसिक तणाव घटवते आणि आनंद वाढवते.
झाडांजवळ बसणं, खिडकीतून आकाश पाहणं, किंवा ५ मिनिटं फक्त निसर्गात रमणं यामुळे मनाला ताजेपणा मिळतो.