सोशल मीडियावर 'डिजिटल डिटॉक्स' का गरजेचं आहे?

Monika Shinde

सोशल मीडिया

आजकाल सोशल मीडिया आपल्याला दररोज जोडलेलं असतं. पण सतत स्क्रीनला चिकटून राहिल्यामुळे मानसिक ताण, तणाव वाढू शकतो. त्यामुळे डिजिटल डिटॉक्स करणे फार गरजेचे आहे.

डिजिटल डिटॉक्स म्हणजे

डिजिटल डिटॉक्स म्हणजे काही वेळा सोशल मीडिया आणि डिजिटल उपकरणांपासून विश्रांती घेणे. हे मन आणि शरीराला रीचार्ज करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.

आरोग्य सुधारते

सतत फोन वापरल्याने झोपेचा वेळ कमी होतो, डोळ्यांवर ताण येतो आणि लक्ष विचलित होते. त्यामुळे नियमित डिजिटल डिटॉक्स केल्याने आरोग्य सुधारते.

नातेसंबंध सुधारते

डिजिटल डिटॉक्समुळे आपण नातेसंबंधांवर अधिक लक्ष देऊ शकतो, कारण सतत फोनमध्ये रमल्यामुळे जवळच्या लोकांशी संवाद कमी होतो.

मानसिक शांतता मिळते

सोशल मीडियावर होणारी सतत तुलना आणि नकारात्मक पोस्ट्स मनावर ताण आणतात. डिटॉक्समुळे मानसिक शांतता मिळते आणि आत्मविश्वास वाढतो.

ऊर्जा मिळेल

डिजिटल डिटॉक्स करताना पुस्तक वाचन, योग किंवा एखादी छंद आवर्जून स्वीकारा. यामुळे मनाला नवीन ऊर्जा मिळेल आणि वेळ चांगल्या प्रकारे व्यतीत होईल.

डिजिटल सवयींवर नियंत्रण मिळेल

डिटॉक्सचा वेळ सुरुवातीला कमी ठेवा, मग हळूहळू वाढवा. हा एक प्रक्रिया आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या डिजिटल सवयींवर नियंत्रण मिळेल.

प्रोटीनने भरलेलं पीनट बटर खाण्याचे ७ जबरदस्त फायदे!

येथे क्लिक करा