संतोष कानडे
राजस्थानमध्ये असलेला हा किल्ला भारतातला सगळ्यात प्रसिद्ध आणि भयावह किल्ला मानला जातो. आजही या किल्ल्यामध्ये सूर्यास्तापूर्वी आणि सूर्योदयानंतर कोणालाही थांबण्याची परवानगी नाही.
येथे रात्रीच्या वेळी रडण्याचे आणि ओरडण्याचे आवाज येतात, असं लोक सांगतात. लोककथेनुसार एका तांत्रिकाने या किल्ल्याचा शाप दिला होता.
आपल्या पुण्यात असलेला शनिवारवाडा पेशव्यांच्या इतिहासाचा साक्षिदार आहे. किल्ल्यात एक क्रूर घटना घडल्याने तो शापित असल्याचं म्हटलं जातं.
१७७३ मध्ये नारायणराव पेशवे यांची त्यांचेच काका राघोबादादा आणि काकूंनी कट रचून हत्या केली. शेवटी नारायणराव म्हणालेले, काका मला वाचवा.
राजस्थानमधील जैसलमेर जवळचा हा परिसर. येथे एका रात्रीमध्ये गाव रिकामं झाल्याचं सांगितलं जातं.
मुलीची अब्रू वाचवण्यासाठी संपूर्ण गावाने रात्रीतून जाण्याचा निर्णय घेतला. शेवटी त्यांनी शाप दिला की, इथे पुन्हा कुणी राहू शकणार नाही. तेव्हापासून हे गाव ओसाड आहे.
हा किल्ला हैदराबाद येथे आहे. येथे एक भयंकर गुपित दडल्याचं सांगितलं जातं. येथे तारामती नावाच्या नर्तकीचा आत्मा भटकतो, असं म्हटलं जातं.
रात्रीच्या वेळी किल्ल्यामध्ये नाचण्याचे आणि घुंगराचे आवाज येतात, असं पर्यटक आणि तेथील लोक सांगतात.
या किल्ल्यामध्ये अदृश्य शक्तींचा वावर असल्याचं म्हटलं जातं. किल्ल्याच्या पडक्या भिंतींमध्ये जीन राहतात, असं म्हटलं जातं.
आजही लोक इथे येतात आणि मेणबत्त्या पेटवतात, जीन आमची इच्छा पूर्ण करेल, अशी लोकांची धारणा आहे.