संतोष कानडे
साताऱ्यामध्येच असलेलं पाचगणी हे ठिकाण महाबळेश्वरपासून जवळ आहे. पाचगणी पाच टेकड्यांवर बसलेलं आहे.
पाचगणीमध्ये सिडनी पॉईंट, टेबल लँड, पारसी पाईंट ही बघण्यासारखी ठिकाणं आहेत.
अमरावतीमधील चिखलदरा हे विदर्भामध्ये असलेले एकमेव थंड हवेचं ठिकाण. सातपुडा पर्वतरागांमध्ये तुम्हाला कॉफीचे मळे बघायला मिळतील.
चिखलदरा आणि परिसरात बघण्यासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्प, गाविलगड किल्ला, शक्कर तलाव, भीमकुंड आहे.
साताऱ्यातलं महाबळेश्वर म्हणजे दुसरा स्वर्गच. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये हे ठिकाण वसलेलं आहे. शिवाय इथली स्ट्रॉबेरी शेती फेमस.
येथूनच पाच नद्यांचा उगम होतो. कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री. वेण्णा लेक, प्रतापगड, विल्सन पॉईंट, ऑर्थर सीट हे इथले प्रमुख आकर्षणे
रायगड जिल्ह्यातलं माथेरान हे खूपच लोकप्रिय आणि आकर्षक असं ठिकाण आहे. येथे वाहनांना बंदी असल्याने प्रदूषणमुक्त असं ठिकाण आहे.
माथेरानमध्ये टॉय ट्रेन प्रमुख आकर्षण मानलं जातं. नेरळ ते माथेरान अशी ही ट्रेनची सफर असते. येथे बघण्यासाठी पॅनोरा पॉईंट, इको पॉईंट, शार्लोट लेक आहे.
सगळ्यात बेस्ट आणि मस्त काय असेल तर ते पुण्याजवळचं लोणावळा-खंडाळा. पुण्या-मुंबईच्या लोकांसाठी हे प्रमुख आकर्षण आहे.
येथे भुशी डॅम, राजमाची पॉईंट, टायगर पॉईंट आणि कार्ला भाजे लेणी बघायला मिळतात.