Anushka Tapshalkar
ओपन पोअर्स हे सर्वसाधारणत: अनुवंशिकता, त्वचेवरील अनियंत्रित तेल आणि आजूबाजूचे पर्यावरण यामुळे होणारी सामान्य समस्या आहे. मात्र योग्य जीवनशैली व नियमित स्किनकेअर रुटीन फॉलो केल्यास ही समस्या दूर करता येते.
Open Pores
sakal
रोज दिवसातून दोन वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा. मात्र जोरात स्क्रब करणे किंवा जोरात चेहरा धुणे टाळा. त्यामुळे पोअर्स अधिक मोठे दिसू शकतात.
Mild Cleansing
sakal
सूर्याच्या किरणांमुळे त्वचेचं कोलेजन कमी होतं आणि पोअर्स मोठे दिसू लागतात. त्यामुळे SPF ३० किंवा त्यापेक्षा जास्त असलेलं सनस्क्रीन वापरा.
Protection from Sun
sakal
४% नायसिनामाइड असलेलं सीरम वापरल्याने चेहऱ्यावरचं तेल कमी होतं आणि पोअर्स लहान दिसतात. हे सकाळी आणि संध्याकाळी वापरल्यास त्वचा मऊ आणि स्वच्छ दिसते.
Use Niacinamide
sakal
रेटिनॉइड्स त्वचेचा पोत सुधारून कोलेजन वाढवतात आणि पोअर्स लहान दिसण्यास मदत करतात. अपेक्षित परिणामांसाठी सुरुवातीला कमी प्रमाणात वापरून हळूहळू वाढवा आणि त्यासोबत दररोज SPF वापरायला विसरू नका.
Retinol
sakal
काओलिन किंवा बेंटोनाइट असलेले क्ले मस्क अतिरिक्त तेल कमी करून त्वचा स्वच्छ आणि गुळगुळीत बनवतात. आठवड्यात १–२ वेळा वापरून नंतर हलकं मॉइश्चरायझर लावल्यास त्वचा संतुलित आणि हायड्रेटेड राहते.
Clay Masks for Oil Control
sakal
ओपन पोअर्ससारख्या त्वचेच्या समस्यांसाठी त्वचा मॉईश्चराइज्ड असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्वचेच्या प्रकारानुसार मॉइश्चरायझर्स वापरले, तर पोअर्स बंद न होता संतुलन राखता येते. त्वचा हायड्रेट राहिल्यास पोअर्स कमी दिसतात.
Use Right Moisturizer
sakal
नियमित आणि योग्य काळजी घेतल्याशिवाय त्वचेत मोठा बदल लगेच दिसून येत नाही. सुरुवातीला एक महिन्यानंतर थोडेसे सुधारित परिणाम दिसू लागतात, पण पोअर्स लहान दिसण्यासाठी आणि त्वचा मजबूत होण्यासाठी वेळ देणे आणि सातत्याने उपचार करणे आवश्यक आहे.
Have Patience and Consistency in Skincare Routine
sakal
समतोल आहार, पुरेशी झोप आणि मानसिक तणाव नियंत्रित ठेवल्यास त्वचेचा पोत सुधारतो आणि पोअर्स निरोगी राहतात.
Lifestyle is Also Important
sakal
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Doctor's Advice
sakal