Anushka Tapshalkar
३० वर्षांनंतर पुरुषांच्या आरोग्यात बदल होऊ लागतात. मधुमेह, कोलेस्टेरॉल, पचन, हाडं आणि रोगप्रतिकारशक्ती याकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. यासाठी सध्या चर्चेत असलेला सोपा उपाय म्हणजे भेंडीचं पाणी! चला जाणून घेऊया याचे फायदे.
भेंडीमध्ये आढळणाऱ्या फायबर्समुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी हे पाणी उपयुक्त.
भेंडीतील म्युसिलेज (Mucilage) हा जेलसारखा घटक आतड्यांमध्ये नैसर्गिक स्नेहकासारखा काम करतो, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचन दूर होतात.
व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्समुळे भेंडीचं पाणी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतं, सर्दी-खोकल्यासारख्या आजारांपासून संरक्षण करतं.
भेंडीतील फायबर्स कोलेस्टेरॉल कमी करतात आणि अँटीऑक्सिडंट्स धमनींमध्ये ब्लॉकेज होऊ देत नाहीत, त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन K मुळे हाडांची घनता टिकवून ठेवण्यास मदत होते, वृद्धिंगत वयात हाडांचे आजार टाळता येतात.
भेंडीचं पाणी पचन सुधारून शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतं.
कॅलरी कमी आणि फायबर्स भरपूर असल्यामुळे भेंडीचं पाणी पोट भरल्यासारखं वाटतं, जे वजन कमी करण्यात मदत करतं.
४-५ भेंडी कापून रात्री पाण्यात भिजवा. सकाळी ते गाळून रिकाम्या पोटी प्या. सुरुवात थोड्या प्रमाणात करा.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.