Evening Breakfast साठी फळांपासून बनवा 'हे' ५ पदार्थ

सकाळ डिजिटल टीम

उन्हाळा तीव्रतेने वाढत आहे.

अश्या हवामानात, आपल्याला दिवसभरात थंड आणि हायड्रेटेड राहण्यासाठी हलके आणि पौष्टिक पदार्थ खायची गरज असते.

संध्याकाळची न्याहारी हा असा वेळ आहे जेव्हा आपण दिवसभरातील थकवा दूर करू शकतो

आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात संध्याकाळच्या न्याहारीसाठी बनवण्यासाठी ५ स्वादिष्ट आणि पौष्टिक फळांपासून बनणारे पदार्थ सांगणार आहोत.

फ्रूट सलाद

फ्रुट सलाड बनवण्यासाठी तुमच्या आवडीनुसार विविध प्रकारची फळे सफरचंद, स्ट्रॉबेरी, केळी, द्राक्षे आणि संत्रींचा वापरू शकता.

स्मूदी

स्मूदी हे पौष्टिक न्याहारी पर्याय आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार विविध प्रकारची फळे,केळी, पालक, स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरीं, दही आणि दूध वापरून ते बनवू शकता.

फ्रूट रोल-अप्स

हे मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी एक मजेदार आणि स्वादिष्ट न्याहारीचा पर्याय आहेत. तुम्ही विविध प्रकारची फळे आणि टोस्ट ब्रेड वापरून ते बनवू शकता.

फ्रूट आणि नट्ससह ओट्स

ओट्स हे फायबरचा उत्तम स्रोत आहे. तुम्ही त्यात ताजी फळे आणि बदाम, अक्रोड आणि काजू यांसारखे नट्स घालू शकता.

फ्रूट टॉपिंगसह दही

दही हा प्रथिने आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. तुम्ही त्याला अधिक चव आणि पोषण देण्यासाठी त्यात ताजी फळे केळी, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि मध घालू शकता.

उन्हाळ्यात संध्याकाळच्या न्याहारीसाठी फळं हा एक उत्तम आणि पौष्टिक पर्याय आहेत.

तुम्हाला थंड आणि हायड्रेटेड राहण्यास मदत करतील. तर नक्कीच हे झटपट पदार्थ ट्राय करून बघा !