जिममध्ये जाणाऱ्यांनी सावधान! जास्त प्रोटीन पावडर घेतल्याने शरीराचे 'हे' अवयव धोक्यात

Aarti Badade

फिटनेसच्या नादात अतिरेक नको!

आजकल स्नायू बनवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी हाय-प्रोटिन डाएटचा ट्रेंड वाढला आहे. पण गरजेपेक्षा जास्त प्रोटीन तुमच्या शरीरासाठी 'स्लो पॉयझन' ठरू शकते.

Excess protein symptoms

|

Sakal

किडनीवर ताण आणि लघवीत बदल

अतिरिक्त प्रोटीनमुळे किडनीला जास्त काम करावे लागते. जर तुम्हाला लघवीला फेस येत असेल किंवा रंगात बदल जाणवत असेल, तर हे किडनीवर ताण येत असल्याचे लक्षण आहे.

Excess protein symptoms

|

Sakal

वारंवार तहान लागणे

जास्त प्रोटीनमधील नायट्रोजन बाहेर टाकण्यासाठी शरीराला जास्त पाण्याची गरज भासते. यामुळे तुम्हाला सतत तहान लागणे आणि शरीर कोरडे पडल्यासारखे वाटू शकते.

Excess protein symptoms

|

Sakal

पचनाच्या गंभीर समस्या

प्रथिनांचे अतिसेवन पोटावर नकारात्मक परिणाम करते. यामुळे सतत गॅस होणे, बद्धकोष्ठता (Constipation) किंवा अतिसाराचा त्रास जाणवू शकतो.

Excess protein symptoms

|

Sakal

श्वासाची दुर्गंधी

जेव्हा शरीर ऊर्जेसाठी कर्बोदकांऐवजी फॅट जाळते (केटोसिस), तेव्हा श्वासाला दुर्गंधी येऊ शकते. हाय-प्रोटिन डाएट घेणाऱ्यांमध्ये हे लक्षण प्रामुख्याने दिसते.

Excess protein symptoms

|

Sakal

अनपेक्षित वजन वाढणे

अनेकांना वाटते की प्रोटीनने फक्त स्नायू वाढतात, पण गरजेपेक्षा जास्त घेतलेल्या प्रोटीनचे रूपांतर फॅटमध्ये होते, ज्यामुळे तुमचे वजन कमी होण्याऐवजी वाढू लागते.

Excess protein symptoms

|

Sakal

हाडांवर होतो विपरीत परिणाम

अतिरिक्त प्रोटीनमुळे शरीरातील कॅल्शिअम बाहेर टाकले जाते, ज्यामुळे हाडे कमकुवत होऊन सांधेदुखी सुरू होऊ शकते. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच प्रोटीनचे प्रमाण ठरवा.

Excess protein symptoms

|

Sakal

हात-पायात झिणझिण्या? दुर्लक्ष करू नका; शरीर देतंय गंभीर आजाराचे संकेत!

hands and feet feel numb

|

Sakal

येथे क्लिक करा