Aarti Badade
अनेकदा एकाच स्थितीत बसल्यामुळे किंवा झोपताना हातापायांना झिणझिण्या येतात. पण हा त्रास वारंवार होत असेल, तर ते शरीरातील अंतर्गत बिघाडाचे लक्षण असू शकते.
hands and feet feel numb
Sakal
नसांवर जास्त दबाव आल्यामुळे शरीराला आवश्यक रक्तपुरवठा होत नाही. रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे हात-पाय सुन्न पडतात आणि वेदना वाढू लागतात.
hands and feet feel numb
Sakal
शरीरातील नसांच्या आरोग्यासाठी विटामिन बी-१२ अत्यंत महत्त्वाचे आहे. याची पातळी कमी झाल्यास हातापायांना झिणझिण्या येण्यासोबतच प्रचंड थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.
hands and feet feel numb
Sakal
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास नसा कमजोर होतात. यामुळे हात-पायांना आग होणे, जळजळ होणे किंवा सतत सुन्नपणा जाणवणे अशा समस्या उद्भवतात.
hands and feet feel numb
Sakal
जर तुमच्या मनगटाची नस दबली गेली असेल किंवा बोटांमध्ये सतत झिणझिण्या येत असतील, तर हा 'कार्पल टनल सिंड्रोम' असू शकतो. याचा संबंध मानेच्या समस्यांशीही असू शकतो.
hands and feet feel numb
Sakal
थायरॉईडमुळे शरीरातील चयापचय क्रिया (Metabolism) बिघडते, ज्याचा थेट परिणाम नसांवर होतो. यामुळे शरीराच्या विविध भागांत सुन्नपणा जाणवतो.
hands and feet feel numb
Sakal
हातापायांत सुन्नपणा येण्यासोबतच चक्कर येणे किंवा बोलताना अडखळणे अशी लक्षणे दिसत असतील, तर हा स्ट्रोक (Stroke) असू शकतो. अशा वेळी तातडीने डॉक्टरांकडे जावे.
hands and feet feel numb
Sakal
चुकीच्या पोझिशनमध्ये झोपणे किंवा पोषक घटकांची कमतरता याकडे दुर्लक्ष करू नका. ही लक्षणे वारंवार दिसत असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करा.
hands and feet feel numb
Sakal
Throat cancer symptoms
Sakal