जेवणानंतर पोट फुगतंय? गॅस आणि ब्लोटिंगचा त्रास कमी करण्यासाठी करा ‘हे’ ५ सोपे व्यायाम!

Anushka Tapshalkar

गुडघे छातीकडे घेण्याचा व्यायाम

पाठीवर झोपून दोन्ही गुडघे छातीकडे घ्या आणि हातांनी हलकेच पकडा. काही सेकंद या स्थितीत राहा. यामुळे पोटाला हलका ताण मिळतो आणि गॅस व ब्लोटिंग कमी होण्यास मदत होऊ शकते.

Knees-to-Chest Pose

|

sakakl

भिंतीवर पाय उंच करून ठेवण्याची मुद्रा

भिंतीजवळ पाठीवर झोपून दोन्ही पाय भिंतीला टेकवून सरळ वर ठेवा. हात सैल सोडा. या आसनामुळे शरीराला आराम मिळतो आणि तणाव कमी होण्यास मदत होते.

Legs-Up-The-Wall Pose

| sakal

बसून शरीराला पीळ देण्याचा व्यायाम

जमिनीवर पाय दुमडून किंवा खुर्चीवर ताठ बसा. शरीराचा वरील भाग हळूहळू उजव्या आणि नंतर डाव्या बाजूला वळवा. यामुळे पाठीचा कणा आणि पोटाचे स्नायू सक्रिय होतात.

Seated Body Twist

|

sakal

मार्जारी आसन

दोन्ही हात आणि गुडघ्यांवर बसा. श्वास घेताना पोट खाली सोडा आणि श्वास सोडताना पाठ गोलाकार करा. यामुळे स्नायूंना ताण मिळतो.

Cat Cow Pose | sakal

जेवणानंतर हळूहळू चाला

जेवणानंतर लगेच झोपण्याऐवजी १० ते १५ मिनिटे हलके चाला. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.

Slow Walking

|

sakal

पोटातून खोल श्वास घेण्याचा व्यायाम

शांत ठिकाणी आरामात बसून एक हात पोटावर ठेवा. नाकाने हळूहळू श्वास घेताना पोट फुगू द्या आणि नंतर हळूहळू श्वास सोडा. या व्यायामामुळे शरीराला आराम मिळतो आणि तणाव कमी होतो.

Deep Belly Breathing

|

sakal

वज्रासन

जमिनीवर गुडघे टेकवून पायांच्या टाचांवर बसा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवून पाठ ताठ ठेवा. सुरुवातीला २ ते ५ मिनिटे या स्थितीत बसण्याचा प्रयत्न करा. वज्रासन हे जेवणानंतर केले जाणारे पारंपरिक योगासन आहे.

Vajrasana

|

sakal

महत्त्वाची टीप

जेवणानंतर तीव्र व्यायाम टाळा आणि हलके चाला. सतत ब्लोटिंग किंवा पोटदुखी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Doctor's Advice | sakal

एकनाथ शिंदे ६२व्या वर्षीही फिट! कशी आहे लाइफस्टाईल? काय खातात, काय पितात?

Eknath Shinde Fitness

|

sakal

आणखी वाचा